मुंबई : कपडे हा पुरुष आणि महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, मोठ्या व्यक्तींच्या कपड्यांप्रमाणेच लहानाचे देखील कपडे बाजारात खूप महाग मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का? बाजारात मिळणारे लहान मुलांचे कपडे जे रिटेलमध्ये 400 ते 500 रुपयांत मिळतात. त्याची खरी किंमत नक्की किती असेल? फक्त 95 रुपये. होय ! होलसेलमध्ये हेच लहान मुलींचे 2 पीस [पॅन्ट आणि टॉप] फक्त 95 रुपयांत मिळतात. त्यामुळे लहान मुलींच्या कपड्यांचा हा व्यवसाय कसा करायचा याबद्दच माहिती देणार आहोत.
advertisement
मुंबईतील दादरचे 4 मजली जनता मार्केट हे विविध कपड्यांचे होलसेल मार्केट आहे. या ठिकाणी अगदी सर्व प्रकारचे कपडे होलसेल किंमतीत मिळतात. त्या विविध दुकानांपैकी A -1, A-2 एक दुकान आहे. ज्यात लहान मुलींचे 2 पीस, ड्रेस, फ्रॉक इत्यादी कपडे होलसेल किंमतीत मिळतात. भारतातील अनेक उद्योजक या ठिकाणाहून मोठ्या संख्येत माल खरेदी करतात आणि त्याचा रिटेल व्यवसाय करतात.
असा करा स्वतःचा व्यवसाय
A -1, A-2 या दुकानाचे व्यवस्थापक आकाश सिंग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या होलसेल दुकानात 95 रुपयांपासून लहान मुलींचे 2 पीस [पॅन्ट आणि टॉप] मिळतात. त्याचप्रमाणे 100-150-200 या किंमतीत लहान मुलींचे फ्रॉक या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या सोबतच 6 महिन्यांपासून लागणारे बाळाचे कपडे ते 18 वर्ष पर्यंतच्या लागणाऱ्या कपड्यांचे साईज या ठिकाणी मिळतील. हा व्यवसाय सुरुवातीला प्रदर्शन किंव्हा लहान स्टॉलवर चालू करता येईल.
एवढं स्वस्त कुठंच नाही, चक्क किलोवर मिळतायेत कपडे, चिंधी मार्केट माहितीये का? Video
कमीत कमी 10,000 रुपयांचे भांडवल खरेदी केल्यास 570-600 प्रति नग एवढी कपड्यांची क्वांटिटी मिळते. रिटेल व्यवसाय करण्यापूर्वी आजूबाजूच्या बाजाराचे निरीक्षण करून कमीत कमी 30-50 टक्के मारजीन सेट करावे. आणि वेळोवेळी नवीन कलेक्शन आल्यास ते भांडवल वाढवत जावे, असंहा आकाश सिंग यांनी सांगितले.