एवढं स्वस्त कुठंच नाही, चक्क किलोवर मिळतायेत कपडे, चिंधी मार्केट माहितीये का? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
चिंधी मार्केटमध्ये 30 रुपये मीटर पासून 3 हजार रुपये मीटर पर्यंतचे सगळ्या प्रकारचे कपडे मिळतात.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
ठाणे: खरेदी म्हटलं की सगळ्यांचाच आवडता विषय असतो. आपण बऱ्याचदा महागडी कपडे खरेदी करत असतो. पण ठाण्यातील चिंधी मार्केटमध्ये चक्क किलोवर कपडे मिळतात. तेही 30 ते 40 रुपयांच्या किमतीत. या चिंधी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे डिझायनर फॅब्रिक मिळतात. या फॅब्रिकपासून तुम्ही साड्या, ब्लाऊज, घागरे, वन पिस, गाऊन यासारखे अनेक डिझायनर कपडे शिवून घेऊ शकता. विशेष म्हणजे हे शिवलेले कपडे लग्न कार्यात घालू शकता. स्वस्तात होणारी कपड्यांची ही खरेदी सर्वांनाच भुरळ पाडणारी आहे.
advertisement
चिंधी मार्केट कुठे आहे?
डोंबिवली पूर्व येथे हे चिंधी मार्केट आहे. डोंबिवली पूर्व येथे मानपाडा रोड, डोंबिवली जवळील गोळवली या गावात हे चिंधी मार्केट असून स्टेशनपासून फक्त 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. एका छोट्याशा गल्लीमध्ये हे मार्केट वसलेलं आहे. मात्र त्या गल्लीत प्रवेश केल्यावर आपल्याला छोटी छोटी दुकाने दिसायला सुरुवात होते. याठिकाणी अनेक होलसेल दुकानं आहेत.
advertisement
चिंधी मार्केट नाव कसं पडलं ?
चिंधी मार्केटमध्ये पूर्वी डोंबिवली एमआयडीसी येथून आलेले काही कट पिसेस विक्रीसाठी येत असतं. त्यावेळी विविध रंगातील फॅब्रिक विकले जात होते. तेव्हापासून या मार्केटला चिंधी मार्केट असं म्हटलं जायला लागलं. आता या मार्केटमध्ये सुरतहून तसेच अनेक वेगवेगळ्या ठिकाणांहून फॅब्रिक मागवत असल्याचंही विक्रेते सांगतात.
advertisement
चिंधी मार्केटमध्ये मिळणारी व्हरायटी
चिंधी मार्केटमध्ये 30 ते 40 रुपये मीटर पासून 3 हजार रुपये मीटर पर्यंतचे सगळ्या प्रकारचे फॅब्रिक पाहायला मिळतात. या मार्केटमध्ये फॅब्रिक घेण्यासाठी मोठ मोठे फॅशन डिझायनर येतात. इतकेच नव्हे तर या मार्केटमध्ये फॅब्रिक घेतल्यानंतर कपडे शिवून देखील दिले जातात. मुख्य म्हणजे इथे किलोवरही कट पिस मिळतात. किलोवर विकताना साधारण 150 रुपये तर काही ठिकाणी 200 ते 300 रुपये किलोही किंमत आहे. तर फॅब्रिक मीटरवर मिळते. 1 ते 2 मिटरचे कटपीस मिळतात. तेही वजन करून दिले जातात.
advertisement
कपड्याच्या अनेक व्हरायटी
जसं फॅब्रिक असेल तशी मीटर प्रमाणे किंमतही बदलत जाते. हे कट पिस विविध रंगाचे आणि विविध प्रतीचे कापड पाहायला मिळतात. जसं चिकनकारीचा कपडा घ्यायचा असेल तर 100 ते 150 रुपये मीटर आहे. तर, कॉटनमध्ये घ्यायचं असेल तर ते 120 ते 150 रुपये मीटर मिळतं. तसेच प्रिंटेडमध्ये असलेलं कापड घ्यायचं असेल तर 80 रुपये मीटर मिळतात. तर ऑरगॅंजा टीशूच्या साडीचं कापड घ्यायचं असेल तर ते 90 रुपये आहे. असे अनेक प्रकारचे फॅब्रिक तुम्हाला पाहायला मिळतील. जरदोसी वर्क, प्रिंटेड, फ्लॉवर प्रिंटेड ब्रोकेट, नेट, चिकन, लखनवी, सॅटीन, रॅम्बो, वेलवेट असे फॅब्रिकचे विविध प्रकार मिळतात. वेलवेटमध्ये नऊवारी साड्या मिळतात. तसेच चिंधी मार्केटमध्ये नऊवारी साड्या शिवूनही मिळतात. त्यामुळे होलसेल किंना रिलेटमध्येही तुम्हाला हवं ते फॅब्रिक खरेदी करायचे असतील तर चिंधी मार्केट उत्तम पर्याय आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
February 15, 2024 9:53 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
एवढं स्वस्त कुठंच नाही, चक्क किलोवर मिळतायेत कपडे, चिंधी मार्केट माहितीये का? Video