एवढा स्वस्त लॅपटॉप कुठंच नाही, फक्त 18 हजारांत मिळतोय अ‍ॅपल, Video

Last Updated:

HP पासून ते Apple पर्यंत आणि टच स्क्रीनच्या लॅपटॉप पर्यंत सगळ्या प्रकारचे लॅपटॉप या ठिकाणी स्वस्तात मिळतात.

+
एवढा

एवढा स्वस्त लॅपटॉप कुठंच नाही, फक्त 18 हजारांत मिळतोय अ‍ॅपल, Video

मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
ठाणे: सध्याच्या काळात विद्यार्थी आणि इतर नोकरदारांसाठी लॅपटॉप ही गरजेची गोष्ट बनलीय. ठाण्यातील एका दुकानात अगदी स्वस्तात लॅपटॉप मिळतायेत. प्लॅटफॉर्म नंबर 1 च्या बाहेर पडल्यानंतर पश्चिमेला 'न्यू लॅपटॉप पार्टस' नावाचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे. याठिकाणी फक्त 6 हजार रुपयांपासून लॅपटॉप मिळतील. विशेष म्हणजे अ‍ॅपलचा लॅपटॉप फक्त 18 हजार रुपयांपासून मिळतोय. प्रत्येक लॅपटॉपच्या प्रकारानुसार किंमत बदलत जातेय. तसेच लॅपटॉप सोबत बॅग, माऊस आणि किबोर्डही दिला जातोय. त्यामुळे जुने आणि नवे लॅपटॉप खरेदी करण्यासाठी येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते.
advertisement
स्वस्तात मस्त लॅपटॉप
एच.पी.पासून ते अ‍ॅपलपर्यंत तसेच टच स्क्रीनच्या लॅपटॉप पर्यंत सगळ्या प्रकारचे लॅपटॉप या ठिकाणी मिळतात. अ‍ॅपलच्या लॅपटॉपची किंमत 18 हजार रुपयांपासून सुरु होते. तर एच.पी मध्ये टच स्क्रिनच्या लॅपटॉपची किंमत 18500 रुपयांपासून सुरु होते. एच.पी.च्या आय फाय 8 ची किंमत 23 हजार रुपये आहे. कोणाला सुरुवातीला कमी बजेटवाला लॅपटॉप आणि तोही वॉरेंटीसहित हवा असेल तर फक्त 6 हजारांत या ठिकाणी लॅपटॉप मिळतोय. सेंकड हँड अ‍ॅपलचा टॅबलेटही येथे मिळतात. त्यांची किंमत 7 ते 8 हजारांपासून सुरू होते. तर सॅमसंगच्या टॅबची किंमत 9 हजारांपासून सुरू होते. हे सर्व लॅपटॉप हे ओपन बॉक्स प्रोडक्ट असल्याने ग्राहकांना स्वस्तात मिळतात.
advertisement
ओपन बॉक्स प्रोडक्ट म्हणजे काय?
ओपन बॉक्स" लेबल केलेल्या उत्पादनांचा अर्थ असा असतो की, या प्रोडक्टचे पॅकेजिंग उघडले गेलेले असते. मात्र कधीही वापरलेले नसतात. ओपन बॉक्स उत्पादने नवीन सारख्या स्थितीत असतात. नवीन प्रोडक्टच्या तुलनेत या प्रोडक्टवर सवलती जास्त असतात. तथापि, सर्व उपकरणे आणि घटकांचे डिव्हाइस योग्य कार्य स्थितीत आहे याची खात्री करण्यासाठी उघडलेल्या बॉक्स प्रोडक्टची काळजीपूर्वक तपासणी करून घेणे, हे त्या दुकानदारांसाठीही तितकच महत्वाचं असतं. नवीन उत्पादनांच्या तुलनेत ओपन बॉक्स प्रोडक्टवर मर्यादित वॉरंटीही असते.
advertisement
कमी बजेटमध्ये लॅपटॉप
"ओपन बॉक्स प्रोडक्टमध्ये ग्राहकांना 30 ते 40 हजारांचा फायदा होतो. तसेच या लॅपटॉपवर आणि टॅबवर आम्ही जशी त्यांची किंमत असते तशी त्यांच्यावर वॉरंटीही देतो. तसेच काहीही बदल करायचा असल्यास आम्ही तेही करून देतो. त्यामुळे आमच्याकडून घेऊन गेलेल्या प्रोडक्टवर कधीही कोणालाही अडचण आली नाही," असं दुकानाचे मालक गोपालदास यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कमी बजेटमध्ये लॅपटॉप वॉरेंटीसह घ्यायचा असेल तर नक्कीच ओपन बॉक्स प्रोडक्ट हा चांगला पर्याय आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
एवढा स्वस्त लॅपटॉप कुठंच नाही, फक्त 18 हजारांत मिळतोय अ‍ॅपल, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement