फुलंब्री तालुक्यातील खंबाटवस्तीतील ही घटना. शाळेत जात असताना 3 मुलं अचानक जमिनीवर पडली. त्यांच्या पायातील ताकद गेल्याचं त्यांच्या पालकांनी सांगितलं. एका मुलाच्या आईने सांगितल्यानुसार सकाळी उठल्या उठल्याने मुलाने त्याच्या पायाची बोटं दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याने अंघोळ केली स्वतःचं सगळं आवरलं आणि तो शाळेत जायला निघाला. एक किलोमीटर चालला त्यानतंर तो खालीच कोसळला तो उठलाच नाही. नंतर त्याला गाडीवरून रुग्णालयात नेलं.
advertisement
Heart Attack : हार्ट अटॅक, हार्ट फेल आणि कार्डियाक अरेस्ट वेगवेगळे कसे, सगळ्यात जास्त डेंजर काय?
एबीपीच्या वृत्तानुसार या मुलांवर उपचार करणाऱ्या डॉ. राजश्री रत्नपारखी यांनी 3, 8, 11 वर्षाची ही मुलं असल्याचं सांगितलं. त्यांना पोस्ट व्हायरल म्हणजे व्हायरर फिव्हरनंतर होणारे आजार, जीबीएस, पोलिओसारखे इतर दुर्मिळ आजार असू शकतात, असा संशय व्यक्त केला आहे. त्याबाबत तपासणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
या मुलांना जीबीएस असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विहिरीचं पाणी आणि पशुधन याचीही तपासणी केली जात आहे.
काय आहे जीबीएस?
गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा सर्वात गंभीर प्रकार म्हणजे वैद्यकीय आणीबाणी. मेयो क्लिनिकच्या म्हणण्यानुसार, या स्थितीतील बहुतेक लोकांना रुग्णालयात उपचारांची आवश्यकता असते. जीबीएस हा आजार एक ऑटो इम्यून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये इम्युनिटी सिस्टीम कमजोर होते आणि पेरिफेरल सिस्टमवर अटॅक होतो. GBS या आजाराची लागण झाल्यानतंर तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती आजूबाजूच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते.
जीबीएसची लक्षणे काय?
थकवा किंवा हातापायाला मुंग्या येणं, झिणझिण्या येणं, शरीर कमजोर झाल्यासारखे वाटणं.
अचानकपणे चालताना त्रास होणे, पायऱ्या चढणे किंवा चढता न येणं.
चेहऱ्याच्या हालचालींमध्ये अडचण, बोलणं, चघळणं किंवा गिळणं यासह, दुहेरी दृष्टी किंवा डोळे हलवता न येणं.
तीव्र वेदना जाणवतात.
मूत्राशय नियंत्रण किंवा आतड्यांसंबंधी समस्या, खूप दिवस डायरियाचा त्रास होणं.
जलद हृदय गती, कमी किंवा उच्च रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
Heart Attack : तुमच्या पाण्याच्या बाटलीमुळेही तुम्हाला येऊ शकतो हार्ट अटॅक, पण कसा?
कोणाला होऊ शकतो आजार?
गुइलेन बॅरे सिंड्रोम हा कोणालाही होऊ शकतो. काही संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल त्यामध्ये फ्लू किंवा covid 19 प्रकारची इन्फेक्शन पाहायला मिळत.
ज्या रुग्णांनी कुठलीही लस घेतली असेल तर जीबीएसचा धोका हा उद्भवू शकतो. परंतु हे क्वचित रुग्णांमध्ये पाहिला मिळत. त्याचप्रमाणे कुठलीही मोठी सर्जरी किंवा दुखापत झाली असेल तर इथेही जीबीएसचा धोका हा पाहिला मिळतो. तसंच वयोवृद्ध नागरिक आणि ज्यांची इम्युनिटी ताकद कमी झाली असेल त्यांना देखील हा धोका उद्भवू शकतो.
काय काळजी घ्यायची?
हा आजार फारच दुर्मिळ असल्याने याबद्दल सतर्क राहणं गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. दररोज पिण्याचं पाणी बदलावं. तसंच पाणी उकळून प्यावं. यासोबतच नेहमी स्वच्छ आणि ताजं अन्न खावं, आपल्याला रेस्पीरेटरी इन्फेक्शन होऊ नये यासाठी वारंवार हात स्वच्छ धुणं, चेहरा आणि डोळ्याला सारखा हात न लावणं, तसंच पाणी उकळून पिणं, अन्न चांगल्या पद्धतीने शिजवून खाणं, कच्च किंवा शीळ अन्न खाल्ल्यामुळेही जीबीएसचा धोका रुग्णांमध्ये पाहिला मिळतो.