TRENDING:

Mental Health : मनाचं आरोग्य सांभाळा, फास्ट फूडला दूर ठेवा, या मेंटल हेल्थ टिप्स नक्की वाचा

Last Updated:

मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी दहा ऑक्टोबर रोजी हा दिन साजरा केला जातो. नैराश्य किंवा चिंता या समस्यांसाठी, उपचार म्हणून औषधं, थेरपी असतात. पण दैनंदिन खाण्याच्या सवयीही तुमच्या मूडवर परिणाम करू शकतात याचा कधी विचार केला जात नाही. काही पदार्थ आणि पौष्टिक कमतरता थेट मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आज जागतिक मानसिक आरोग्य दिन. मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी दहा ऑक्टोबर रोजी हा दिन साजरा केला जातो. नैराश्य किंवा चिंता या समस्यांसाठी, उपचार म्हणून औषधं, थेरपी असतात.
News18
News18
advertisement

पण दैनंदिन खाण्याच्या सवयीही तुमच्या मूडवर परिणाम करू शकतात याचा कधी विचार केला जात नाही. काही पदार्थ आणि पौष्टिक कमतरता थेट मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. पॅकेज्ड स्नॅक्स, बर्गर, पिझ्झा आणि मिठाई यांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधे साखर, मीठ आणि ट्रान्स फॅटचं प्रमाण जास्त असतं. हे पदार्थ सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या मूड-बूस्टिंग न्यूरोट्रांसमीटरला कमी करू शकतात. परिणामी, मूड स्विंग, चिडचिडेपणा आणि नैराश्याची शक्यता जास्त असते.

advertisement

Mental Health : मन शांत राहण्यासाठी या पाच गोष्टी नक्की करा, वाचा सविस्तर

मीठ आणि साखरेचं असंतुलन शरीरासाठी हानिकारक आहे. जास्त मीठामुळे तणाव, थकवा आणि चिंता यासारखे मूड विकार होऊ शकतात. साखरेचं प्रमाण कमी होणं, म्हणजेच रक्तातील साखरेचे अचानक कमी होणं, यामुळे एखाद्या व्यक्तीला थकवा आणि नैराश्यासारखे वाटू शकतं. कॉर्टिसोल सारख्या ताण संप्रेरकांची पातळी वाढते, ज्यामुळे मानसिक चिंता निर्माण होते.

advertisement

कॅफिन आणि अल्कोहोल - कॉफी, चहा, एनर्जी ड्रिंक्स ज्यात कॅफिन जास्त असतं त्यामुळे उत्तेजना मिळते आणि यामुळे निद्रानाश निर्माण होऊ शकतो. अल्कोहोलमुळे मूडवर नकारात्मक परिणाम होतो आणि नैराश्याचा धोका वाढतो. ही पेयं तुमच्या मेंदूतील रसायनांमधे व्यत्यय आणू शकतात आणि मानसिक आजारांना कारणीभूत ठरू शकतात.

पौष्टिक कमतरता -  मेंदूला योग्य इंधनाची आवश्यकता असते. व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम आणि लोहाची कमतरता असेल तर मानसिक थकवा, चिडचिडेपणा आणि नैराश्य वाढू शकतं. ओमेगा-३ फॅटी एसिडच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती आणि मूडवर परिणाम होतो. हे सर्व घटक मेंदूच्या पेशींना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

advertisement

Banana : रोज दोन केळी खाण्याचे फायदे, आजार पळतील दूर, या हेल्थ टिप्स नक्की वाचा

मेंदू आनंदी ठेवण्यासाठी काय खावं ?

अक्रोड, जवस आणि सॅल्मन हे ओमेगा-3 चे उत्कृष्ट स्रोत आहेत.

अंडी, मशरूम आणि दूध हे व्हिटॅमिन डीसाठी आवश्यक आहेत.                                                        हिरव्या भाज्या, चणे आणि गूळ यामुळे लोह आणि मॅग्नेशियम मिळतं.

advertisement

डार्क चॉकलेट, केळी आणि दही हे मनस्थिती चांगली ठेणारे पदार्थ आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरासारखी चव आणि किंमतही कमी, दिवाळीचा फराळ ठाण्यात इथं सगळ्यात स्वस्त
सर्व पहा

खाण्याच्या सवयी बदलल्याने मानसिक आराम मिळू शकतो. त्यामुळे Mindful eating वर म्हणजेच आपण काय खातोय, का खातोय याची पूर्ण जाणीव ठेवून खाण्याचा सराव करा. आहार काळजीपूर्वक घ्या, घाई करू नका. फास्ट फूडऐवजी संतुलित आणि घरी शिजवलेलं जेवण खा. आहार पोषक घटकांनी संतुलित असल्याची खात्री करा. कॅफिन आणि साखरेचे सेवन मर्यादित करा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mental Health : मनाचं आरोग्य सांभाळा, फास्ट फूडला दूर ठेवा, या मेंटल हेल्थ टिप्स नक्की वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल