हे मधुमेहींसाठी धोकादायक असतं. म्हणूनच ही माहिती खास मधुमेहींसाठी काही पदार्थ
कोणताही सण मिठाईशिवाय अपूर्ण असतो. यामुळेच सणासुदीला गोड पदार्थ नक्कीच तयार केले जातात. इथे दिलेल्या पदार्थांमुळे, मधुमेही रुग्णही गोड खाऊ शकतील आणि त्यांची रक्तातील साखरही नियंत्रणात राहील.
ड्रायफ्रूट लाडू - सुक्या मेव्याचे लाडू
मधुमेही रुग्ण सुक्या मेव्याचे लाडू खाऊ शकतात. ड्रायफ्रुट्स बारीक करुन घ्या, लाडू बांधण्यासाठी खजूर आणि किसमिस बारीक करुन घ्या. तुम्हाला हवा तो सुका मेवा काढून घ्या. यामध्ये मुख्यत: बदाम, काजू, अक्रोडचा वापर केला जातो. त्यामुळे हे लाडू पौष्टीक आणि चवदार असतात.
advertisement
Diwali Diet Tips - फराळाच्या नादात पोटाकडे दुर्लक्ष नको, आयुर्वेदिक चहानं पोट राहिल ताब्यात
चिया सीड्स पुडिंग -
तुम्ही चिया सीड्स पुडिंग बनवू शकता. यासाठी बदामाच्या दुधात चिया सीडस् भिजवा. यात स्टीव्हिया किंवा मोंक फ्रूटसारख्या नैसर्गिक स्वीटनरचा वापर करु शकता. याशिवाय चवीसाठी त्यात ड्रायफ्रूट्स टाकू शकता.
Diwali Skin Care - क्रिम लावण्याऐवजी वापरा मुलतानी माती, मुलतानी मातीचे फेसपॅक नक्की वापरुन पाहा
नारळाच्या पीठाचे पॅनकेक्स -
हे पॅनकेक नारळाचं पीठ, अंडी आणि बदामाच्या दुधापासून बनवले जातात आणि गोडपणासाठी त्यात शुगर फ्री
सिरप टाकलं जातं. याशिवाय त्यावर ताजी फळं टाकू शकता. यासाठी लागणाऱ्या नारळाचं पीठ तयार करण्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत.
