दिवाळीत बऱ्याचदा जास्त तळलेलं अन्न, फराळ आणि मिठाई खाल्ल्यानं गॅस, अॅसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. दिवाळीत मनापासून पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल आणि पोटाच्या समस्या टाळायच्या असतील, तर हे पाच सोपे घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
Dry Skin : वातावरणासोबतच ही जीवनसत्वंही आवश्यक, या स्किन केअर टिप्स ठरतील उपयोगी
advertisement
जेवणानंतर प्या ओव्याचं पाणी - ओवा पोटासाठी वरदान आहे. यातल्या घटकांनी पचन सुधारतं आणि गॅस लवकर कमी होतो. एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा उकळवा. पाणी अर्धं कमी झाल्यावर ते गाळून हळूहळू प्या. जेवणानंतर ते प्यायल्यानं पोटाला आराम मिळेल.
आलं - आल्यात पचनाचे गुणधर्म आहेत. आम्लपित्त आणि मळमळ यासाठी देखील आलं खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर आल्याचा एक छोटा तुकडा सैंधव मीठासह चावा. यामुळे अन्न पचण्यास मदत होईल आणि पोट हलकं वाटेल.
जिरं - जिऱ्याचं पाणी पिणं हा पोटदुखीवर रामबाण पर्याय आहे. एक चमचा जिरं वाटून एक ग्लास पाण्यात घाला. काही मिनिटं उकळवा आणि थंड झाल्यावर प्या. या उपायानं पचन सुधारतं आणि आम्लपित्त कमी होतं.
Hair Mask : केस गळतीवर प्रभावी उपाय, हेअर मास्कनं वाढेल केसांची चमक आणि वाढ
हिंग - पचनासाठी हिंग सर्वात प्रभावी आहे. हिंग हा पोटफुगी आणि गॅस कमी करण्यासाठी एक प्राचीन आणि प्रभावी उपाय मानला जातो. कोमट पाण्यात चिमूटभर हिंग विरघळवून प्या. यामुळे गॅस लगेच कमी होईल.
बडीशेप आणि साखरेचं मिश्रण - बडीशेपेमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि मौखिक आरोग्यासाठीही बडीशेप उपयुक्त आहे. यामुळे मुख दुर्गंधी कमी होते. साखरेसोबत बडीशेप खाल्ल्यानं त्याचा प्रभाव जाणवतो. जेवणानंतर थोडीशी बडीशेप आणि साखर चघळा. यामुळे यामुळे मुख दुर्गंधी कमी होते आणि अॅसिडिटी आणि छातीत जळजळही कमी होईल.