अपसायकलिंगमुळे तुम्हाला तुमच्या घरातील वस्तूंमध्ये स्वतःची कला आणि कल्पनाशक्ती वापरण्याची संधी मिळते. यामुळे तुमचा वॉर्डरोब आणि घर अधिक खास आणि टिकाऊ बनू शकते. तुम्ही तुमच्या जुन्या फर्निचरला नवीन रूप देण्यासाठी तयार आहात का? चला मग जाणून घेऊया काही सोप्या टिप्स..
अपसायकलिंगसाठी महत्त्वाच्या टिप्स..
- अपसायकलिंगसाठी मजबूत आणि चांगल्या स्थितीत असलेले फर्निचर निवडा. जर फर्निचर लाकडी असेल तर ते अधिक सोपे जाते. कारण लाकूड कापून, घासून किंवा रंगवून सहज बदलता येते.
advertisement
- काम सुरू करण्यापूर्वी तुमच्या फर्निचरला कोणते नवीन रूप द्यायचे आहे, हे ठरवा. तुम्ही त्याचा रंग बदलणार आहात, त्यात काही नवीन भाग जोडणार आहात की त्याचा उपयोग दुसऱ्या कामासाठी करणार आहात, याचा विचार करा. यासाठी इंटरनेटवर अनेक कल्पना उपलब्ध आहेत.
- काम सुरू करण्यापूर्वी जुने फर्निचर स्वच्छ करा. त्यावरची धूळ, घाण आणि जुना रंग पूर्णपणे काढून टाका.
अपसायकलिंगच्या काही सोप्या कल्पना
रंग आणि पॅटर्न वापरा..
- तुमच्या जुन्या लाकडी टेबलला नवीन आणि आकर्षक रंग द्या. यासाठी तुम्ही पेस्टल रंग किंवा गडद रंगांचा वापर करू शकता.
- साध्या लाकडी खुर्च्यांवर विविध भौमितिक पॅटर्न किंवा डिझाइन काढा.
- ड्रॉवरच्या बाहेरच्या बाजूला सुंदर डिझाइन असलेले कागद किंवा वॉलपेपर चिकटवा. यामुळे ते पूर्णपणे वेगळे दिसतील.
पुन्हा वापर करा..
- जुन्या लाकडी शिडीचा वापर पुस्तके किंवा शोभेच्या वस्तू ठेवण्यासाठी करू शकता.
- जुन्या लाकडी दरवाजाचा वापर मोठा टेबल किंवा बेड हेडबोर्ड बनवण्यासाठी करू शकता.
- जुने सूटकेस वापरून एक खास कॉफी टेबल किंवा स्टोरेज बॉक्स तयार करू शकता.
नवीन भाग जोडा..
- जुन्या कपाटाचे हँडल बदलून नवीन आणि आधुनिक हँडल लावा.
- टेबलाच्या पायांना नवीन रंग देऊन त्याला वेगळा लूक द्या.
- खुर्चीच्या सीटवर नवीन फॅब्रिक वापरून तिला अधिक आरामदायक आणि आकर्षक बनवा.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.