गुना : हवामान बदलताच साथीचे आजार बळावतात. सध्या हिवाळ्यातील आजारांनी जवळपास प्रत्येकजण त्रासात आहे. या आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण संतुलित आहार घेतो, शिवाय शरिराला व्यायामदेखील महत्त्वाचा असतो. त्यामुळे आज आपण अशी तीन आसनं पाहूया, ज्यांमुळे आजारपण दूर राहतील आणि शरिरातील अतिरिक्त चरबीदेखील कमी होईल.
योग ट्रेनर संजय चौरसिया सांगतात की, एखाद्या व्यक्तीने कमीत कमी 30 सेकंद आणि जास्तीत जास्त एका मिनिटासाठी 3 आसनं केली तर शरीर सुदृढ आणि आपण ऊर्जावान राहतो.
advertisement
उपचार करूनसुद्धा सर्दी, खोकला जाईना? 'ही' 4 फळं खा आणि झटक्यात आराम मिळवा!
- भुजंग आसन
या आसनामुळे मन इतकं उर्जावान राहतं की, डिप्रेशन येऊच शकत नाही. कंबर, मान आणि खांदेदुखीवरही आराम मिळतो. शिवाय शरिरातील हाडं मजबूत होतात. शरिरातील चरबीवरही नियंत्रण मिळतं.
काय काळजी घ्यावी?
या आसनात व्यक्ती जमेल तितकं मागच्या बाजूला वाकते. त्यामुळे आपल्या पोटात किंवा पाठीत दुखत असेल तर हे आसन अजिबात करू नये. शिवाय गरोदर महिलांनीदेखील हे आसन करू नये.
लसूण उपाशीपोटी खाल्ल्यास वजन झटपट होतं कमी! फक्त खाताना करू नका 'ही' चूक
- मत्स्य आसान
या आसनामुळे शरीर प्रचंड ऊर्जावान राहतं. फुप्फुसं सुदृढ राहतात. महिलांमध्ये गर्भाशय आणि मासिकपाळीशी संबंधित आजार दूर होतात. पोटातील चरबी कमी होते. खोकल्यावरही आराम मिळतो.
काय काळजी घ्यावी?
रक्दाबाचा त्रास असल्यास हे आसन करू नये. मान किंवा पाठीच्या खालच्या बाजूस दुखत असल्यास हे आसन करू नये. मायग्रेशन, डिप्रेशन असेल तरीही हे आसन करू नये.
- नौका आसन
खास पोटातील आणि पोटाच्या बाजूची चरबी कमी करण्यासाठी हे आसन आहे. यामुळे पोटाची आणि कंबरेची हाडंदेखील मजबूत होतात. मधुमेहापासूनही मुक्ती मिळते.
काय काळजी घ्यावी?
खांदे दुखत असतील किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल, तर हे आसन करू नये. ज्या व्यक्तींना या आसनामुळे चक्करसारखं वाटत असेल, त्यांनीदेखील ते करू नये.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g