TRENDING:

Mahaparinirvan Din : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनास ‘महापरिनिर्वाण दिन’ का म्हटलं जातं?

Last Updated:

6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यामुळंच या दिवसाला 'महापरिनिर्वाण दिन' किंवा 'महापरिनिर्वाण दिवस' म्हटलं जातं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 5 डिसेंबर : 6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यामुळंच या दिवसाला 'महापरिनिर्वाण दिन' किंवा 'महापरिनिर्वाण दिवस' म्हटलं जातं. महापरिनिर्वाणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी मुंबईमधील दादरस्थित चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
News18
News18
advertisement

महापरिनिर्वाण म्हणजे काय?

बौद्ध धर्मानुसार महापरिनिर्वाण हे आयुष्याचे प्रमुख तत्व आणि ध्येय देखील आहे. संस्कृतमध्ये महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ ‘परिणीबाना’ असा सांगितला आहे, याचाच अर्थ ‘मोक्ष’ असा होतो. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवन चक्रातून मुक्त होतो, म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्मातील लोक बाबासाहेबांना ‘बोधिसत्व’ मानतात. त्यामुळं त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.

advertisement

चैत्यभूमीला लाखो लोक देतात भेट

मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरबी समुद्राला लागून असलेल्या बाबासाहेबांच्या समाधीला भेट देण्यासाठी भारतभरातून लाखो येतात. अत्यंत आदरानं चैत्यभूमीला भेट देतात. बाबासाहेबांची प्रतिमा व मुर्तीसमोर अभिवादन करतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याचा थोडक्यात आढावा

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यामधील 'महू' येथे झाला.

advertisement

- भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.

- अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इकोनॉमिक्समध्ये पी.एच.डी. मिळवली. असे करणारे ते पहिलेच भारतीय होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, पारशी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच इ. भाषा त्यांना अवगत होत्या.

- डॉ. आंबेडकर यांच्या 'The Problem of the Rupee – Its origin and its solution' पुस्तकाच्या आधारावर 'रिझर्व बँक ऑफ इंडिया'ची पायाभरणी झाली.

advertisement

- तत्कालीन भारतीय समाजात अस्पृश्यांना दिली जाणारी हीन वागणूक डॉ. आंबेडकरांनी स्वतः अनुभवली होती. त्यामुळे त्यांच्या हक्कांसाठी ते आयुष्यभर झटले.

- 'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा', असा संदेश त्यांनी जनतेला दिला.

- 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर येथे 5,00,000 अनुयायांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

- 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथील राहत्या घरी झोपेत असताना या महामानवाचं महापरिनिर्वाण झालं. दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mahaparinirvan Din : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनास ‘महापरिनिर्वाण दिन’ का म्हटलं जातं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल