लातूरच्या डॉक्टरांनी हा वजन कमी करण्याचा वेगळाच फॉर्म्युला सांगितला आहे. डॉ. राम जावळे असं त्यांचं नाव आहे. आता दोन ताटात जेवून वजन कसं काय कमी होईल? हे त्यांनी सविस्तरपणे स्पष्ट करून सांगितलं आहे. डॉ. राम जावळे यांनी सांगितलं की, दोन ताट घ्यायचे पण दोन्ही ताटातील पदार्थ वेगवेगळे आहेत. जेवताना पहिलं ताट आधी संपवायचं त्यानंतरच दुसऱ्या ताटाकडे वळायचं.
advertisement
पहिल्या ताटात काय काय घ्यायचं?
पहिल्या ताटात काकडी, बीट, टोमॅटो असे सलाट, मोड आलेले कडधान्य, ताक किंवा दही, लिंबू, हिरव्या पालेभाज्या, उकडलेली अंडी आणि कच्चे खाता येतील असे पदार्थ या ताटात खाण्यासाठी घ्यायचे. दही-ताकामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढतात. मोड आलेल्या कडधान्यांमुळे शरीराला प्रोटिन मिळतं. उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग पूर्ण खा, पण पिवळा भाग अर्धा खा.
Acidity Gas ! अॅसिडीटी असो वा गॅस, 10 मिनिटांत आराम; हिंगोलीच्या डॉक्टरांनी सांगितलाय मॅजिकल उपाय
पहिल्या ताटात असलेले सगळे कच्चे पदार्थ स्वच्छ धुवून घ्या, बारीक बारीक चावून ध्या, तोंडात पाणी होईपर्यंत चावा. यातून व्हिटॅमिन्स, क्षार, खनिजं, फायबर मिळतील. शरीराला कॅलरीज मिळतील, पोट साफ व्हायला मदत होईल, रक्तदाब, डायबेटिज, हार्ट अटॅक, अर्धांगवायू, दमा असे गंभीर आजार होणार नाहीत. रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, तुमची त्वचा तरुण दिसेल, मेंदूची कार्यक्षमता चांगली होईल.
दुसऱ्या ताटात काय काय घ्यायचं?
आता ताट क्रमांक दोनमध्ये थोडी पोळी-भाकरी, वरण-भात आणि एखादी भाजी. वरण जास्त घ्या. कारण यात प्रोटिन असतात. भाजी म्हणजे भाजी असावी, त्यात ग्रेव्ही वगैरे नाही. चपाती असेल तर तेल नको, भात-चपाती कमी घ्यावी.
ताट क्रमांक एकमधून आपण काही गोड, तेलकट, मीठ खाल्लेलं नाही. म्हणजे जे 3 घटक कंट्रोल करायचे ते आपोआप कंट्रोल झालेले आहेत. त्यामुळे या ताटातून चांगले फायदे मिळतील. शिवाय आधी पोट तसं भरलं आहे, थोडीशी जागा आहे. त्यामुळे ताट क्रमांक 2 मधील पदार्थ फार जाणार नाही.
जेवणानंतर गोडला पर्याय
दोन्ही ताटात लोणचं पापड वगैरे घ्यायचं नाही. कधीतरी ठिक आहे. काहींना जेवणानंतर गोड खायची सवय असते. पण या आहारातूनच ग्लुकोज मिळतं. त्यामुळे वेगळ्या गोडची गरज नाही. आईस्क्रिम, श्रीखंडऐवजी तुम्ही डार्क चॉकलेट, खजूर खा.
मुंबईच्या डॉक्टरांनी सांगितली अशी एक गोष्ट, जी पुरुषांनी ताबडतोब सोडायला हवी
तुमचं पोटही गच्च भरेल आणि काही दिवसांनी तुम्ही पाहाल तर वजन कमी झालेलं असेल आणि मेंटेन राहिल. पोटाच्या तक्रारी इतर आजारही नाहीसे होतील. कारण तुमची रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढेल.
(सूचना : हा लेख सोशल मीडियावर डॉक्टरांच्या व्हिडीओवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी स्वतः तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
