लिपस्टिक दिसायला जितकी आकर्षक तितकीच ती खतरनाक आहे, असं म्हणायला हरकत नाही. विशेषतः जर लिपस्टिकवर हे दोन शब्द असतील, जे डॉक्टरांनी सांगितले आहेत. लिपस्टिकवर २ शब्द असण्याचा धोका त्यांनी सांगितला आहे. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मनन व्होरा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी लिपस्टिकबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
advertisement
लेडीज अंडरवियरमध्ये का असतं असं हे छोटं सीक्रेट पॉकेट? महिलांनाही माहिती नाही याचा उपयोग
डॉ. मनन व्होरा म्हणाले, "तुमची लिपस्टिक तुमच्या मासिक पाळीला उशिरा येण्याचे कारण असू शकते. अनेक लिपस्टिक, विशेषतः स्वस्त किंवा अनियंत्रित लिपस्टिकमध्ये असे रसायने असतात जे तुमच्या हार्मोन्समध्ये गोंधळ घालू शकतात. सर्वात मोठा दोषी म्हणजे बीपीए (बिस्फेनॉल ए), जो प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये आढळतो. हे रसायन इस्ट्रोजेनची नक्कल करतं आणि तुमच्या शरीराच्या हार्मोनल सिस्टमला गोंधळात टाकू शकतं. म्हणून इथं दोन शब्द आहेत जे तुम्ही लिपस्टिकवर शोधले पाहिजेत ते म्हणजे मिथाइल पॅराबेन आणि प्रोपिइल पॅराबेन. त्याऐवजी लेबलवर पीपीए फ्री किंवा पॅराबेन फ्रीऐवजी हे दोन शब्द असतील तर लिपस्टिक लगेच फेकून द्या.
तसंच त्यांनी लेबलवर तुम्हाला भारतात विश्वास ठेवता येईल अशा प्रमाणपत्रांची यादी देखील दिली. यामध्ये इकॉसर्ट, कॉसमॉस ऑरगॅनिक/नॅचरल, यूएसडीए ऑरगॅनिक आणि पेटा इंडिया क्रुएल्टी फ्री यांचा समावेश आहे.
लिपस्टिक लावण्याचे इतर दुष्परिणाम
म्हणून तुमच्याकडे असलेली लिपस्टिक किंवा लिपस्टिक खरेदी करण्यापूर्वी ती उलटी करा, लेबल वाचा आणि ती सुरक्षित आहे याची खात्री करा.
सायन्सडायरेक्टवर प्रकाशित केलेल्या संशोधनात असे दिसले की, त्यात हेवी शिसे, क्रोमियम आणि कॅडमियम सारखी रसायने आहेत जी त्वचेसाठी हानिकारक आहेत.
General Knowledge : दर 2 महिन्यांनी बदलतो मानवी शरीराचा 'हा' पार्ट
इतकंच नाही तर त्यात असलेल्या हानिकारक गोष्टींमुळे न्यूरोलॉजिकल समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यात असलेले क्रोमियम पोटात गेल्यास पोटात अल्सर, क्रॅम्प्स, किडनी, यकृताला इजा होऊ शकते आणि मृत्यूही होऊ शकतो. काही क्रोमियम संयुगे त्वचेत शोषून घेतात आणि त्वचेवर व्रण निर्माण करतात.
याशिवाय, जर क्रोमियम जास्त प्रमाणात पोटात गेले तर हा जड धातू हृदय आणि मेंदूसाठी देखील धोकादायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही लिपस्टिक वापरत असाल तर सावध राहणे गरजेचे आहे. अशा समस्या टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.