झाँसी : आपल्या किचनमध्ये असलेले सर्व मसाले आरोग्यासाठी उपयुक्त असतात. या प्रत्येक मसाल्यात स्वतःचे असे विशिष्ट औषधी गुणधर्म असतात, या त्यांना स्वतःची वेगळी चव असते. जी पदार्थात उतरते आणि अन्नपदार्थ स्वादिष्ट होतात. हळद असो किंवा गरम मसाला असो, मसाल्यांची नावं कशी पडली तुम्हाला माहितीये का? आज आपण दालचिनीला दालचिनी का म्हणतात हे सविस्तरपणे जाणून घेऊया.
advertisement
झाडाच्या सालीसारखा दिसणारा हा मसाला चवीला काहीसा तिखट-गोड असते. त्यामुळे जेवणाची चव वाढतेच, शिवाय आरोग्यालाही खूप फायदे मिळतात. फूड एक्सपर्ट डॉ. प्रणव भार्गव सांगतात की, दालचिनीला जगभरात Cinnamon या नावाने ओळखलं जातं. भारतात हा मसाला चीनमार्गे आणण्यात आला होता. चीनहून आणलेल्या जवळपास सर्व पदार्थांच्या नावापुढे चिनी लावलं जातं. शिवाय हा मसाला झाडाच्या फांदीपासून काढला जातो. फांदीला हिंदीत डाल म्हणतात.
डॉ. प्रणव सांगतात, झाडाच्या फांदीतून काढला जात असल्याने आणि चीनहून आणल्यामुळेच या मसाल्याला नाव पडलं दालचिनी. जवळपास प्रत्येक घरात या मसाल्याचा वापर होतो. प्रत्येक भारतीय किचनमध्ये दालचिनी आढळते.
तसंच आयुर्वेदातही दालचिनीचे फायदे सांगितलेले आहेत. त्यामुळे हा मसाला आरोग्यासाठी प्रचंड उपयुक्त आहे. त्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म भरभरून असतात.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा