कलिंगडाच्या शेतीतून किती लाख रुपये मिळतात माहितीये? एकदा या शेतकऱ्याची कमाई वाचा

Last Updated:

कलिंगड आणि खरबूज ही दोन्ही रसाळ फळं आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे त्यांना बाजारात विशेष मागणी मिळते. परिणामी या शेतकऱ्याची आज लाखोंची कमाई होतेय.

जवळपास 6 एकरात ते खरबुजाचं उत्पन्न घेतात.
जवळपास 6 एकरात ते खरबुजाचं उत्पन्न घेतात.
संजय यादव, प्रतिनिधी
बाराबंकी : शेतकरी बांधव आता पारंपरिक शेतीत आधुनिकता आणून कमालीचं उत्पन्न मिळवू लागले आहेत. शिवाय शेतीपूरक व्यवसायांमधूनही चांगली कमाई होते. शेतकरी सर्वाधिक उत्पन्न मिळवतात ते फळबाग, भाजीपाला आणि फूलझाडांच्या लागवडीतून. कारण फळं, भाज्या, फुलांना बाजारपेठेत दररोज मागणी असते. हंगामी फळांच्या लागवडीतून तर काही शेतकरी बांधव मालामाल झाले आहेत, त्याचंच एक उत्तम उदाहरण आज आपण पाहणार आहोत.
advertisement
बाजारात हंगामी फळांना विशेष मागणी असते, हीच बाब आणि भविष्यातील आपला नफा लक्षात घेऊन उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात राहणाऱ्या एका शेतकऱ्याने कलिंगड आणि खरबुजाची लागवड केली. उन्हाळ्यात ही दोन्ही रसाळ फळं आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे त्यांना बाजारात विशेष मागणी मिळते. परिणामी या शेतकऱ्याची आज लाखोंची कमाई होतेय.
advertisement
श्रीकांत वर्मा असं या शेतकऱ्याचं नाव. ते वर्षानुवर्षे खरबुजाचं उत्पन्न घेत आहेत. सुरुवातीला त्यांनी एका एकरापासून ही शेती सुरू केली होती. त्यातून चांगला नफा मिळाल्यानंतर आज जवळपास 6 एकरात ते खरबुजाचं उत्पन्न घेतात. त्यातून त्यांना दरवर्षी थोडाथोडका नाही, तर तब्बल 8 लाख रुपयांचा नफा मिळतो.
श्रीकांत वर्मा सांगतात की, सुरुवातीला मी देशी खरबुजाचं उत्पन्न घ्यायचो, मात्र त्यातून उत्पादनही चांगलं मिळायचं नाही आणि किंमतही मिळायची नाही, काहीच फायदा होत नव्हता. मग युट्यूबवर पाहून तायवानी खरबुजाचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. त्याला खूप चांगली किंमत मिळाली. या खरबुजाची चवच एवढी भारी असते की लोकांकडून त्याला भरपूर मागणी मिळते. या शेतीत एका एकरासाठी जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च येतो. कारण यात किटकनाशक फवारणी, खत, पाणी, मजुरी असा सगळा खर्च करावा लागतो, परंतु उत्पन्नही तसंच बक्कळ मिळतं. आता या शेतीतून हे शेतकरी सुख-समाधानाचं आयुष्य जगत आहेत.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/मनी/कृषी/
कलिंगडाच्या शेतीतून किती लाख रुपये मिळतात माहितीये? एकदा या शेतकऱ्याची कमाई वाचा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement