कोल्हापूर : सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारची आईस्क्रीम कुल्फी खायला मिळते. आईस्क्रीम प्रेमी या कुल्फीचा मनसोक्त आनंदही घेतात मात्र कोल्हापुरात एक वेगळ्या प्रकारची कुल्फी मिळू लागली आहे. नॉनव्हेज प्रेमी खवय्यांसाठी कोल्हापुरात आता अंडा कुल्फी आणि चिकन अंडा कुल्फी अशा प्रकारचे नवीन पदार्थ मिळू लागले आहेत.
कोल्हापुरातील शाहू मैदान येथील विशाल मिरजकर यांनी हा अंडा कुल्फी आणि चिकन अंडा कुल्फी या नवीन डिश कोल्हापूरकरांसाठी आणल्या आहेत. खरंतर सुरुवातीला विशाल यांच्या एक पानपट्टीचा व्यवसाय होता. नंतर मग त्यांनी चायनिज पदार्थांचा गाडा सुरू केला. पुढे काही वर्षातच त्यांनी स्प्रिंग पोटॅटोचाही अजून एक स्टॉल याच परिसरात सुरू केला. अशाप्रकारे मिरजकर यांचे शाहू मैदान खाऊगल्ली परिसरात वेगवेगळे तीन खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. त्यापैकीच या अंडा कुल्फी आणि चिकन अंडा कुल्फीच्या स्टॉलवर सध्या ग्राहकांची गर्दी वाढत आहे.
advertisement
मराठी मुलगी कशी झाली मोमोज गर्ल? स्वरांगी ठरतेय अनेकांसाठी प्रेरणा
काय आहे अंडा कुल्फी?
अंडा रोल या पदार्थालाच मिरजकर यांनी अंडा कुल्फी नाव दिले आहे. फक्त उकडलेल्या अंड्यांची कुल्फीच्या स्वरुपातील डिश म्हणजे अंडा कुल्फी होय. अंडा कुल्फी बनवताना फक्त कच्चे अंडे फोडून मशीनच्या साच्यामध्ये टाकले जाते. पुढे अंड्याच्या बलकला थोडा घट्टपणा आल्यावर मशीनच्या साच्यामध्ये कुल्फीची स्टिक टाकण्यात येते. फक्त पाच ते सात मिनिटात या इलेक्ट्रिक मशीनमध्ये कुल्फी तयार होते. तर चिकन अंडा कुल्फी बनवताना सुरुवातीला स्टिकला लावलेल्या चिकन सॉसेजचा वापर केला जातो, असे विशाल मिरजकर यांनी सांगितले.
कुल्फी बनवण्यासाठी स्पेशल मशीन
ही अंडा कुल्फी बनवण्यासाठी एक विशेष मशीन लागले ते मिरजकर यांनी मागून घेतले आहे. पूर्णपणे इलेक्ट्रिक असणाऱ्या या मशीनमध्ये एका वेळी दहा कुल्फी तयार होऊ शकतात. तर प्रत्येक कुल्फीच्या साच्यासाठी एक वेगळे बटन देखील देण्यात आले आहे.
उपवासाची मिसळ खावी तर आप्पाची, पुण्यात 55 वर्षांपासून फेमस आहे हे ठिकाण, Video
मिरजकर यांच्या या स्टॉलवर अंडा कुल्फी व्यतिरिक्त मोमोज, पिझ्झा, बर्गर, सँडविच असे पदार्थ देखील मिळतात. तर अंडा कुल्फी, अंडा चीज कुल्फी, चिकन अंडा कुल्फी, चिकन अंडा चीज कुल्फी अशा चार पद्धतीच्या अंडा कुल्फी मिळतात. फक्त 50 रुपयांपासून ते 80 रुपयां पर्यंत या कुल्फींची किंमत आहे. तसेच सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी खवय्यांना अंडा कुल्फीचा आस्वाद घेता येतो, अशी ही माहिती मिरजकर यांनी दिली आहे.
आरोग्यासाठी लाभदायी बीट; घरीच बनवा ‘या’ सोप्या पद्धतीनं लाडू रेसिपी
दरम्यान, मुंबई आणि पुणे अशा ठिकाणी मिळणाऱ्या या डिशचा आस्वाद कोल्हापूरकरांना आता आपल्या शहरात घेता येत असल्यामुळे या ठिकाणी या अंडा कुल्फीची चव चाखण्यासाठी गर्दी होत आहे.
पत्ता :
क्षितिजा स्नॅक्स, खाऊ गल्ली, शाहू मैदान जवळ, मिरजकर तिकटी, कोल्हापूर - 416012