मुंबई - मुंबई म्हटल्यावर सर्वात आधी स्ट्रीट फूडचा विचार केल्यावर सर्वात आधी वडपावचे नाव समोर येते आणि मुंबईचा वडापाव तर आता जगप्रसिद्ध झाला आहे. मात्र, वडापावप्रमाणेच मुंबईतील स्ट्रीट फूडमध्ये पाणीपुरीही तेवढीच प्रसिद्ध आहे. पाणीपुरी म्हटल्यावर पाणीपुरीमध्ये मिळणारा रगडा, त्याचप्रमाणे तिखट पाणी आणि चिंचाच्या चटणीपासून बनणारे गोड पाणी, असे दोनच प्रकार आपल्याला माहिती असतात. मात्र, मुंबईत एक असा पाणीपुरीवाला आहे, ज्याच्याकडे 5 प्रकारचे वेगवेगळे पाणीपुरीमध्ये टाकण्याचे पाणी मिळते. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा आढावा.
advertisement
दादर वेस्ट येथे असणाऱ्या पाणीपुरी स्टॉलवर पाच प्रकारचे पाणी मिळते. यामध्ये टोमॅटोचे पाणी, लसूणचे पाणी, पुदिन्याचे पाणी, हाजमा हजम, नींबू रेग्युलर, अशा पाच फ्लेवरमध्ये पाणी मिळते. टोमॅटो पाणी फ्लेवर हे गोड असते तर लसूण फ्लेवर पाणी थोडे तिखट आहे आणि पुदिना फ्लेवर हे पुदिना पासून बनतात. याची टेस्टसुद्धा पुदिनासारखी लागते तर हाजमा हजम फ्लेवर खट्टा मीठा थोडा तिखट गोड आणि आंबट असा असा हा फ्लेवर लागतो.
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने अनोख्या पद्धतीने साजरी केली दिवाळी, VIDEO
शेवटचाफ्लेवर म्हणजे नींबू रेगुलर. यामध्ये तिखट असते आणि वेगळ्या पाणीपुरीच्या फ्लेवरसारखा लागतो. पाणी पुरीवाल्याने सांगितल्यानुसार तुम्ही जर पाणीपुरी ही बुंदीमध्ये खाल्ली तर तुम्हाला या सर्व पाण्याचा फ्लेवर एकदम उत्तमरित्या समजतो आणि खाताना सुद्धा मज्जा येते.
तुम्ही जर रगड्यामध्ये खाल्ली तर तुम्हाला हे पाणी एकदम फिके लागेल. लोकांकडून हाजमा हजम लिंबू पाणी आणि टोमॅटो पाणी याला जास्त पसंती दिली जात आहे. तर मग तुम्हालाही ही पाणीपुरी खायची असेल तर दादरमधील स्टॉलला नक्की भेट देऊ शकता.