मुंबई : पाणीपुरी म्हटलं की, कोणाच्याही जिभेला पाणी सुटतं. पाणीपुरीचे तसे बरेच प्रकार आपण खाल्ले आणि पाहिले असतील पण तुम्ही कधी 'पिझ्झा पाणीपुरी' खाल्लीये का? घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये ही पिझ्झा पाणीपुरी भलतीच फेमस आहे. घाटकोपर पूर्व भागातील विक्रांत सर्कलजवळ वसुंधरा इमारतीसमोर एक खाऊ गल्ली आहे. तिथल्या मिठाईलाल भेलवाला चाट कॉर्नरमध्ये तुम्हाला ही युनिक पिझ्झा चिज पाणीपुरी खायला मिळेल. या पिझ्झा पाणीपुरीची किंमत आहे 180 रुपये. किंमत जितकी जास्त आहे तितकीच ती चवीला भारी लागते. त्यात स्टफिंगही भरपूर असतं. दोन जणांना ही एक प्लेट पाणीपुरी सहज पुरते. त्यामुळे एकाच प्लेटमध्ये पिझ्झा आणि पाणीपुरी खाल्ल्याचा आनंद मिळतो.
advertisement
आपण आतापर्यंत कोल्ड पाणीपुरी, पुदीना पाणीपुरी, बुंदी पाणीपुरी किंवा अनेक वेगवेगळ्या फ्लेवरअच्या पाणीपुरी खाल्ल्या असतील पण ही पिझ्झा पाणीपुरी खरोखर हटके आहे. ती अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते.
क्लासिक, ग्रिल्ड ते आफ्रिकन बेली; ‘इथं’ मिळतायत श्वारमाचे तब्बल 77 प्रकार Video
कशी बनवली जाते पिझ्झा पाणीपुरी?
जसं पिझ्झासाठी स्फटिंग वापरतात त्याच पद्धतीचं स्टफिंग या पाणीपुरीमध्ये वापरलं जातं. विशेष म्हणजे या पाणीपुरीमध्ये नेहमीच्या पाणीपुरीसारखं कोणत्याही प्रकारचं गोड किंवा तिखट पाणी नसतं. त्याऐवजी मक्याचे दाणे, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, चिली फ्लेक्स, मेयॉनिज आणि वेगवेगळ्या भाज्या वापरून या पाणीपुरीत चीज, सॉसेस टाकले जातात. वरून पुन्हा भरपूर चीज या पुरीवर असतं. त्यामुळे खवय्यांना एका वेगळ्याच चवीची पाणीपुरी चाखायला मिळते.
पपईवर लिंबाचा रस पडूही देऊ नका, पोटात तयार होईल विष!
तुम्हाला रोजच्या पाणीपुरीपेक्षा थोडी वेगळ्या चवीची पाणीपुरी ट्राय करायची असेल किंवा कोणाला जर पिझ्झा आणि पाणीपुरी दोन्ही आवडत असेल तर दोघांचं फ्यूजन म्हणून ही पिझ्झा चीज पाणीपुरी तुमच्यासाठी एक भारी पर्याय आहे. तुम्ही पाणीपुरीचे चाहते असाल तर या पिझ्झा पाणीपुरीचा स्वाद नक्की घ्या.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा