नाशिक : समोसा म्हटलं की, लहान असो अथवा मोठा तोंडाला पाणी येतंच. सर्वत्र समोसा हा उपलब्ध असल्याने याला खवय्यांची मोठी पसंती आहे. पण या समोसा सोबत कढी हे कॉम्बिनेशन तुम्ही कदाचित ऐकलं नसेल. पण नाशिकमध्ये खाद्य प्रेमींना हे कॉम्बिनेशन पाहायला मिळते.
नाशिकमधील रुपेश गायकवाड यांनी खाद्यप्रेमींसाठी कढी-समोसा सुरू करण्याचा निर्णय घेतला. रुपेश हे एक इलेट्रिशिअन असून कोरोनानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. कोरोना काळात सर्वांनाच नोकरीमध्ये अडथळे निर्माण झाले होते. त्यामध्ये रुपेशसुद्धा होते. परंतु त्यांनी हा एक वेगळा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, समोसा हा सर्वत्र सारखाच असतो. त्यावर टाकल्या जाणाऱ्या गोड, आंबट चटणीही सर्वसाधारणपणे मिळतात. पण मी नाशिकमध्ये अनेक ठिकाणी पहिले की, कुठेच असा समोसा नाही. मग आपण काही तरी वेगळ करावं. यावर मी थोडा विचार करत कढी सामोसा ही पद्धत शोधली. गोड आंबट चटणी सर्वत्र मिळते. मात्र, कढी हा प्रकार कुणाकडेही नाही. कढी पकोडा असू शकतो मग कधी समोसादेखील असायला हवा, असे मला वाटले.
आज तब्बल 16 शाखा -
त्यासाठी त्यांनी आंबट कढीवर लाल चटणीही देण्याचा निर्णय घेतला. आता नाशिककरांच्या जीभेवर ही चव बसली असून खवय्यांचा इथे चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज जवळपास त्यांच्या 16 शाखा आहेत. एका साधारण माणसाने 3 वर्षांपूर्वी म्हणजे कोरोना काळात हार न मानता आज स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
किंमत 25 रुपये -
त्यांच्याकडे कढी, समोसा हा फक्त 25 रुपयांना मिळतो. इतकंच नव्हे तर कढी भेळ, कढी भजे, अळुवली असे अनेक प्रकार त्यांनी सुरू केले आहेत. तुम्हालाही येथील चव चाखायची असेल तर तुम्ही नाशिकमध्ये मावली कढी समोसा मुंबई नाका याठिकाणी हा कढी समोसा नक्कीच ट्राय करू शकता.





