कोल्हापूर : उन्हाच्या झळा सोसेनाश्या झाल्या की लोकांची नजर आपोआप वळू लागते ती थंडगार आणि मलईदार लस्सीकडे. यात कोल्हापुरातल्या लस्सीची चव चाखली तर विषयच नाही. विशेष म्हणजे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात खास खारी लस्सी मिळतेय. राजू आवळे हे जनता बाजार चौकात ही लस्सी विकतात. त्यामुळे तळपत्या उन्हाने त्रस्त मधुमेही कोल्हापूरकर देखील या लस्सीचा आस्वाद घेऊ शकतात. सिक्रेट मसाला वापरून बनवलेल्या या खारी लस्सीला चांगला प्रतिसाद मिळत असून लस्सी पिण्यासाठी मोठी गर्दी होतेय. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
कोल्हापूरची मेजर लस्सी
कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरामध्ये जनता बाजार चौकात असणारी मेजर लस्सी राजू आवळे यांनी सुरू केली आहे. या लस्सीचे गोडी लस्सी आणि खारी लस्सी असे दोन प्रकार आहेत. विशेष म्हणजे खारी लस्सी ही संकल्पना कोल्हापुरात आवळे यांनीच आणली. याला डायट लस्सी असंही म्हटलं जातं. ही लस्सी खास ज्यांना मधुमेहचा त्रास आहे त्यांच्यासाठी बनवण्यात येते. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा अशा लोकांना साखरेपासून लांब राहावं लागतं. मात्र त्यावर उपाय म्हणून आवळे यांनी खारी लस्सीच निर्माण केल्याचं सांगितलं. कोल्हापुरातील खारी लस्सी मिळण्याचं हे एकमेव ठिकाण आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
प्रजासत्ताक दिनी मधुमेहीनाही चाखता येणार जिलेबीचा आस्वाद, कोल्हापूरकरांनी लढवली शक्कल !
कशी बनते खारी लस्सी?
आज पर्यंत तुम्ही गोड लस्सीचा स्वाद घेतला असेल, मात्र मेजर राजू आवळे खारी लस्सी बनवतात. त्यांच्या मेजर लस्सी स्टॉलवर ही लस्सी पिण्यासाठी मोठी गर्दी होतेय. खारी लस्सी बनवताना काळे मीठ आणि पांढरे मीठ अशा दोन प्रकारच्या मिठाचा वापर केला जातो. त्यासोबतच त्यांनी विविध प्रयोगातून तयार केलेल्या सीक्रेट मसाल्याचा वापर ते करतात. या मसाल्यामुळे या लस्सीला वेगळ्या प्रकारची चव येते. ही चव कोल्हापूरकरांच्या पसंतीस उतरलेली आहे.
कोल्हापुरातील मेजर लस्सी इथं मिळणाऱ्या खाऱ्या लस्सीला कोल्हापूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. खारी लस्सी 50 रुपयांना हाफ तर 70 रुपयांना फूल्ल ग्लास मिळत असून गोड लस्सी हाफ 30 रुपये आणि फूल्ल 50 रुपयांना दिली जाते. कोल्हापूरकर मोठ्या संख्येने लस्सी पिण्यासाठी येतात. खारी लस्सीचा साधारण 50 ते 60 ग्लासचा खप होतोय. तर गोड लस्सीचे साधारण 100-150 ग्लास रोज विकले जातात, असंही आवळे यांनी सांगितलं.