TRENDING:

महाशिवरात्रीला घरीच बनवा उपवासाचं चाट, तुम्हाला नक्कीच आवडेल, रेसिपीचा संपूर्ण Video

Last Updated:

या महाशिवरात्रीला जर तुम्हाला वेगळं काही खायचं असेल तर तुम्ही उपवासाचं चाट करू शकता. अगदी झटपट आणि मस्त असं हे चाट बनून तयार होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी 
advertisement

छत्रपती संभाजीनगर : यंदा 26 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीला अनेक जण उपवास करतात. उपवासाच्या दिवशी आपण फक्त साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा एवढेच खातो. पण या महाशिवरात्रीला जर तुम्हाला वेगळं काही खायचं असेल तर तुम्ही उपवासाचं चाट करू शकता. अगदी झटपट आणि मस्त असं हे चाट बनून तयार होतं. याची रेसिपी आपल्याला गृहिणी प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.

advertisement

चाट तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

दोन बटाटे, दोन रताळे, उपवासासाठी चालणारे कोणतेही पीठ, हिरवी चटणी, गोड लाल चटणी, दही, उपवासाचा चिवडा, ड्राय फ्रुट्स हे एवढे साहित्य लागतं.

चाट तयार करण्यासाठी कृती

सर्वप्रथम बटाटा आणि रताळे उकडून घ्यायचे. त्यानंतर त्यांचे साल काढून ते बारीक करून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याकडे जे कोणतेही उपवासासाठी चालणारे पीठ असेल ते चार चमचे घालायचं आणि त्याचा गोळा मळून घ्यायचा. त्यानंतर पॅटी करायची त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे. ते दहा ते पंधरा मिनिटं तव्यावरती फ्राय करून घ्यायचे. त्यासाठी थोडं तूप देखील वापरावे.

advertisement

हिरवी चटणी तयार करण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ टाकून हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि त्यावर लिंबू पिळून झाले की ही हिरवी चटणी तयार होते. गोड चटणी तयार करण्यासाठी आमचूर पावडर पाण्यात मिक्स करायचा. त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आणि हे मिश्रण शिजवून घ्यायचं. शिजवून झाल्यानंतर त्याला फोडणी घालायची.

त्यामध्ये तूप आणि थोडेसे जिरे घालून आणि तिखट घालायचं आणि हे मिश्रण गरम करून घ्यायचं अशा प्रकारे लाल गोड चटणी तयार होते. दही हे फेटून घ्यायचं त्यामध्ये मीठ आणि साखर घालायची आणि हे दही तयार होते. एका डिशमध्ये टिक्की घ्यायची त्यावरती प्रथम गोड चटणी टाकायची नंतर हिरवी चटणी टाकायची. त्यानंतर वरतून दही टाकायचं आणि परत हिरवी आणि गोड चटणी टाकायची आणि सगळ्यात शेवटी उपासाचा चिवडा टाकायचा आणि हे उपवासाचे चाट तयार होते. तर या महाशिवरात्रीला हे उपासाचं चाट घरी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
महाशिवरात्रीला घरीच बनवा उपवासाचं चाट, तुम्हाला नक्कीच आवडेल, रेसिपीचा संपूर्ण Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल