विमल मयेकर यांनी लॉकडाऊनपूर्वी आपल्या फूड स्टॉलची सुरुवात केली होती. मात्र केवळ सहा महिन्यांतच देशभरात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे नव्याने सुरू केलेला व्यवसाय थांबला. अनेक जण अशा वेळी नाउमेद झाले असते, पण विमल यांनी हार मानली नाही. लॉकडाऊननंतर, पत्नीच्या साथीने त्यांनी ‘चविष्ट वेंचर्स’ला नवं रूप दिलं. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे त्यांनी आपल्या मेन्यूमध्ये वेगवेगळे वडा पाव प्रकार तसेच इतरही खाद्यपदार्थ समाविष्ट केले.
advertisement
चहा प्या अन् कप खा! जालन्याच्या तरुणाची भन्नाट कल्पना, चक्क फ्लेवरमध्ये मिळतायेत कप!
चिकन वडा पावची एक नंबर चव
‘चविष्ट वेंचर्स’मध्ये मिळणारा चिकन वडा पाव हा अनेक ग्राहकांसाठी नवीन आणि स्वादिष्ट अनुभव ठरतो आहे. पारंपरिक वड्याला चिकनची चव देणं ही एक धाडसी कल्पना होती, पण ती लोकांनी उत्साहाने स्वीकारली. शिवाय, शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे खाद्यप्रेमी येथे आपली भूक भागवू शकतात.
यशस्वी वाटचाल
विमल मयेकर यांची आजची वार्षिक कमाई 5 ते 6 लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आणि मेहनतीमुळे त्यांनी केवळ स्वतःचा व्यवसाय उभा केला नाही, तर इतरांनाही रोजगाराच्या संधी दिल्या. “मराठी माणसाने व्यवसाय करावा, आणि आपल्या जीवावर इतरांचेही पोट भरावे,” या विचाराने प्रेरित होऊन काम करत असल्याचे मयेकर सांगतात.