पुणे : 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीप्रमाणे पुण्यातील खाद्य संस्कृती समृद्ध आहे. शहरात काही प्रसिध्द ठिकाणे आहेत जी वर्षानुवर्षे त्यांच्या खाद्यपदार्थांची तीच चव जपत आहेत. पुण्यातील नारायण पेठ येथे असलेल्या आप्पा उपहार गृहाने 55 वर्ष पुणेकरांची पसंती जपली आहे. यामुळे लोकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते.
नारायण पेठेत असलेल्या आप्पा उपहार गृह हे तिथल्या काकडी खिचडी आणि मटार उसळसाठी प्रसिद्ध आहे. हे आप्पा या नावानेच ओळखले जाते. सोबत या ठिकाणी तुम्हाला उपवासाची मिसळ, खिचडी, मटार उसळ स्लाईस, नुसती मटार उसळ, कोथिंबीर वडी, बटाट वडा चटणी, नुसता वडा असे विविध पदार्थ हे इथले लोकप्रिय पदार्थ आहेत. या ठिकाणाला पुणेकरांची पसंती देखील आहे.
advertisement
मकर संक्रांतीला तिळाचे लाडू विकत कशाला घेता, एकदा घरी करून तर पाहा, फक्त 5 साहित्यांमध्ये तयार!
काकडी खिचडी प्रसिद्ध
आप्पा उपहार गृहात फक्त खिचडी नसते तर त्या सोबत काकडी कोशिंबीर देखील असते. यासोबतच उपवास मिसळ मध्ये बटाट्याची भाजी, शेंगदाणा, खिचडी, उपवासाचा चिवडा असं सगळं दिल जातं. तसेच दही वडा नुसता तसा न देता त्याला फोडणी दिली जाते. हळद, हिंग, जिरी मोहरी फोडणी अशा पद्धतीच सात्विक फुड देण्याचा प्रयत्न करत असतो.
पुण्यात पिकतोय चक्क निळा तांदूळ, पाहा कशी होतीय शेती PHOTOS
पु. ल.ही आवर्जून यायचे
पु. ल. देशपांडेही मटार उसळ खायची तर आप्पाचीच असं म्हणायचे. पुण्यात ही उसळ खूप कमी ठिकाणी मिळते आणि साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन असं पद्धतीने सांबर देतो, तसेच या ठिकाणी आळू वडी, कोथिंबीर वडी देखील मिळते. 30 रुपये पासून ते 130 रुपये पर्यंत विविध नाश्ता प्रकार या ठिकाणी मिळतात, असे मालक संग्राम देशमुख सांगतात.
दरम्यान, मी गेली चार ते पाच वर्षे झालं आप्पा उपहार गृह मध्ये येतो. इथली खिचडी काकडी खूप फेमस आहे. इडली सांबर आणि मटार उसळ तर अप्रतिम आहे. यांची चटणी ही वेगळी आहे, अशी माहिती ग्राहक योगेश यांनी दिली.