इरफान मुल्ला यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये आकुर्डीतील साने चौक येथे 'फॅमिली दालच्या राइस' या नावाने एक छोटासा ढाबा सुरू केला. सुरुवातीपासूनच त्यांनी ठरवलं होतं की हे जेवण सर्वसामान्यांना परवडणारं असावं. त्यामुळे दालच्या राइसची किंमत त्यांनी केवळ 20 रुपये ठेवली आणि विशेष म्हणजे गेली तीन वर्ष ही किंमत त्यांनी बदललेली नाही .या ठिकाणी मिळणारा दालचा राइस हा खास सोलापुरी पद्धीतनं तयार केला जातो. त्यामुळे खवय्यांना आवडतो, असं मुल्ला सांगतात.
advertisement
Best Food In Pune: कोथरूडमध्ये चविष्ट जेवण शोधताय? 'हे' ठिकाण ठरू शकतं उत्तम पर्याय
“दिवसभर कष्ट करणाऱ्या लोकांना पोटभर, चविष्ट आणि परवडणारं जेवण मिळावं, एवढीच माझी मनापासून इच्छा आहे,” असं इरफान सांगतात. ही सामाजिक जाण लक्षात घेऊन त्यांनी आकुर्डी परिसरात सुरू केलेला ‘फॅमिली दालचा राईस’ स्टॉल आज चविष्ट आणि परवडणाऱ्या जेवणासाठी ओळखला जातो. साधेपणा, सेवाभाव आणि खास चव यांच्या जोरावर इरफान यांचा छोटासा स्टॉल अनेकांच्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग बनलाय.





