मुंबई: उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे तहान ही सतत लागत असते. उकाड्यामुळे अनेकांना डिहायड्रेशनषणचा देखील त्रास होतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवणे हा एकमेव सल्ला सर्वच देतात. पण सतत काय पाणी प्याव म्हणून लोक कोल्डड्रिंक किंवा ज्यूस पिण्यास प्राधान्य देतात. याच उन्हाळा सिझनचा फायदा उचलत एका रायगडमधील तरुणाने स्वतःचा फ्रुटज्यूसचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून तो लाखोंची कमाई करत आहे.
advertisement
महाराष्ट्रातल्या रायगड पाली भागात राहत असलेला मयुर पाशीलकर गेल्या 3 वर्षांपासून ताज्या फळांचा सरबत तयार करण्याचा व्यवसाय करत आहे. या सरबताचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलेही केमिकल न वापरता, येथे ताज्या फळांचा पल्प तयार केला जातो. असा पल्प जो फ्रिजच्या बाहेर ठेवून ही 1 वर्ष खराब होणार नाही. मयूर याने सुरु केलेल्या सरबताच्या ब्रांडचे फ्रेश फूड्स असे नाव आहे. पाली या ठिकाणी एक फॅक्टरी असून त्या ठिकाणी या सरबताच्या पल्पचे उत्पादन केले जाते.
वेस्टन ते नॉड वनपीसची करा स्वस्तात खरेदी; पुण्यातील 'या' मार्केटमध्ये खरेदीची संधी
या ठिकाणी सरबत तयार करण्यासाठी लागणारे फळ हे महाराष्ट्रातल्या विविध भागाच्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. परिणामी शेतकऱ्यांना देखील पैसे कमावण्याची संधी मयूरने उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला 5 ते 10 कॅरेट फळ लागायचे पण उन्हाळ्यात अधिक मागणी असल्यामुळे आता तब्बल फळांचे 500 कॅरेट लागतात.
या ठिकाणी विविध फळांचे सरबत तयार केले जातात. सोबतच हेल्थची काळजी घेणाऱ्यांसाठी सुगरफ्री सरबत देखील येथे तयार केला जातो. पेरू, ब्लूबेरी, लिची, कैरीचे पन्हे, जिरा मसाला, मसाला शिकंजी, कालाखट्टा त्यासोबतच शुगर फ्री सरबातमध्ये आवळा, आले, अँबी हळद हे सरबत प्रकार फ्रेश फूड्समध्ये तयार केले जातात.
मी 200 रुपयाला एक बाटली विकत असतो. उन्हाळ्यात भरपूर मागणी असल्यामुळे सोबतच स्वतःची फॅक्टरी असल्यामुळे महिन्याला 1 लाख बाटल्या मुंबई आणि पुणे या ठिकाणी विकल्या जातात. यामधून मला लाखोंची कमाई होत आहे,असं मयूरने सांगितलं.