TRENDING:

पिकलेला आंबा की, कच्ची कैरी? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?

Last Updated:

आंब्यात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार शरिरापासून दूर राहतात. इतकंच नाही, तर आंबा पोटासाठीही खूप फायदेशीर आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिमरनजीत सिंह, प्रतिनिधी
आंबा खाल्ल्याने हाडं भक्कम राहतात.
आंबा खाल्ल्याने हाडं भक्कम राहतात.
advertisement

शाहजहांपूर : पिकलेला आंबा चवीला भारी लागतोच, परंतु कच्चा आंबा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो. या आंब्यात आरोग्यासाठी पोषक असे अनेक घटक असतात. डॉ. विद्या गुप्ता सांगतात की, कच्च्या आंब्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, जस्त, फायबर, तांबे, पोटॅशियम आणि सोडियम यांसारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणावर असतात. ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार दूर होतात.

advertisement

पोटाच्या विकारांवर रामबाण

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या आंब्यात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार शरिरापासून दूर राहतात. इतकंच नाही, तर कच्चा आंबा पोटासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे बद्धकोष्ठतेवर आराम मिळतो, पचनसंस्था मजबूत होते. शिवाय पोटातली ॲसिडिटीही दूर होते.

हेही वाचा :  Heat Wave | किती तापमान असल्यावर उष्णतेची लाट जाहीर करतात? काय असतात निकष?

advertisement

डोळ्यांसाठी फायदेशीर

कच्च्या आंब्यात असलेल्या व्हिटॅमिन एमुळे दृष्टी सुधारते. डोळे निरोगी राहतात. तसंच या आंब्यामध्ये मधुमेहाविरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

हाडं मजबूत होतात

कच्चा आंबा खाल्ल्याने हाडं भक्कम राहतात. यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे दररोज हा आंबा खाल्ल्याने काही दिवसांतच हाडांशीसंबंधित समस्या कमी होतात.

advertisement

हेही वाचा :  Thyroid Control Tips: थायरॉइडचा त्रास असेल तर हे पदार्थ चुकूनही खाऊ नका!

उष्णतेपासून होतं संरक्षण

कच्च्या आंब्यामुळे उष्णतेपासूनही संरक्षण होतं. आपण या आंब्याचं पन्ह बनवून पिऊ शकता किंवा कैरीची चटणीही खाऊ शकता. शिवाय कच्च्या आंब्यामुळे शरीर थंड आणि हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते.

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. परंतु आपण कोणत्याही पदार्थाचा औषधी उपयोग करण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
पिकलेला आंबा की, कच्ची कैरी? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल