विविध पदार्थ येथे मिळतात. तसेच त्यांच्याकडे 8 कामगार आहे त्यांना देखील रोजगार मिळाला असल्याने ते समाधान व्यक्त करत आहेत. तसेच दररोज पाच ते सहा बोकड या हॉटेलसाठी लागतात, या व्यवसायाच्या माध्यमातून काकडे यांची महिन्याला 15 लाखांची उलाढाल होते तर खर्च वजा करून निव्वळ कमाई 3 लाख रुपये होत असल्याचे कोरडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
गाढे जळगाव येथील जालना रोडवर शिवाजी कोरडे हे सुरुवातीच्या काळात नाश्ता चहा, पान सेंटर आणि रसवंतीगृह चालवायचे. स्वतःचा व्यवसाय मोठा व्हावा म्हणून नंतर याच ठिकाणी तिरंगा या नावाने हॉटेल सुरू केली. येथे मटन आणि चिकन थाळी प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव वेरूळ, खुलताबाद ठिकाणाहून खवय्ये या हॉटेलवर जेवणासाठी येत असतात. विशेषतः किचनमधले विविध प्रकारच्या भाज्या, तंदूर, बाजरीची भाकर अशी सर्व कामे सर्व कामे कोरडे यांना येतात. आवश्यकता पडल्यास ते स्वतः हे सर्व पदार्थ बनवतात. तसेच येथे 4 कुक देखील कामासाठी आहे, त्यामुळे जेवणाची सेवा लवकर दिली जाते.
Success Story : पारंपरिक शेतीमधून मिळतं नव्हतं उत्पन्न, नोकरी करत केली बटाटा शेती, 6 लाखांची कमाई
जेवणाची तात्काळ सुविधा, अनलिमिटेड चविष्ट भाज्या आणि पदार्थ दिल्यामुळे दररोज 5 ते 6 बोकड आणि अनेक कोंबड्या हॉटेल तिरंगासाठी लागत असतात. तसेच तरुणांना हॉटेल व्यवसायात यायचे झाल्यास त्यांनी स्वतः हॉटेलसाठी लागणारे सर्व बाबींचे प्रशिक्षण घ्यावे, तसेच स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन देखील कोरडे यांनी तरुणांना केले आहे.





