TRENDING:

Success Story: नोकरीच्या मागे न लागता धरली व्यवसायाची वाट, तरूण करतोय पेवर ब्लॉकमधून 7 लाख कमाई

Last Updated:

नर्सिंगच्या शिक्षणामुळे त्याच्याकडे चांगल्या नोकरीची संधी होती, पण त्याला स्वतःचं काहीतरी वेगळं आणि स्थिर करायचं होतं. याच इच्छेने त्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: बीड जिल्ह्यातील टालेवाडी गावातील गोविंद पालत्या या तरुणाने बीएससी नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाची वाट धरून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. नर्सिंगच्या शिक्षणामुळे त्याच्याकडे चांगल्या नोकरीची संधी होती, पण त्याला स्वतःचं काहीतरी वेगळं आणि स्थिर करायचं होतं. याच इच्छेने त्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
advertisement

शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ त्याने खासगी हॉस्पिटलमध्ये काम केले. पण त्याचं मन तिथे रमले नाही. एका मित्राच्या सल्ल्याने आणि स्वतःच्या शोधातून त्याने पेवर ब्लॉक तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. सुरुवातीला मशीन खरेदी, कच्चा माल, जागेची सोय यासाठी थोडीफार गुंतवणूक करून छोट्या स्तरावर उत्पादन सुरू केले.

advertisement

Raincoat Shopping: पावसाळ्यात करा रेनकोट्सची सर्वात स्वस्त शॉपिंग, किंमत फक्त 40 रुपयांपासून, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?

या व्यवसायात सुरुवातीचे आठ ते नऊ महिने खूपच आव्हानात्मक होते. बाजारपेठेची समज, ग्राहक मिळवणे, गुणवत्तेवर लक्ष देणे या सगळ्याची कठोर मेहनत करावी लागली. काही वेळा तो परत नोकरीत जावे का, असा विचारही करायचा. पण चिकाटी, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने व्यवसायात हळूहळू स्थिरता मिळवली

advertisement

View More

आज गोविंद दररोज शंभर ते दीडशे पेवर ब्लॉक तयार करतो आणि बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्यांची मागणी आहे. घरांसमोरील अंगण, सोसायटी, शाळा, मंदिर परिसर अशा ठिकाणी त्याच्या पेवर ब्लॉक्सचा उपयोग होतो. दर्जा आणि वेळेवर माल पुरवठा या दोन गोष्टींमुळे त्याने ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. यामधून त्यांना 6 ते 7 लाख रुपये उत्पन्न होत आहे. 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कॅफेतला वेटर झाला आर्मी जवान, आईच्या कष्टाचं केलं सोनं, विकासची BSF मध्ये निवड
सर्व पहा

गोविंद पालत्याची ही प्रेरणादायी कहाणी तरुणांसाठी दिशादर्शक ठरते. शिक्षण वेगळे असलं तरी स्वतःचा मार्ग तयार करत त्याने यशाची उंची गाठली आहे. स्वकष्टावर उभा राहणे हीच खरी संपत्ती, असं तो अभिमानाने सांगतो.

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Success Story: नोकरीच्या मागे न लागता धरली व्यवसायाची वाट, तरूण करतोय पेवर ब्लॉकमधून 7 लाख कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल