Garlic : लसूण लवकर खराब होतोय? मग वापरा वापरा हे सोपे आणि प्रभावी स्टोरेज ट्रिक्स, महिनाभरापेक्षा जास्त ताजी राहिल

Last Updated:
लसूण लवकर खराब का होतो? तो साठवण्याची योग्य पद्धत कोणती? वर्षभर लसणाचा ताजेपणा आणि सुगंध कसा टिकवायचा? चला तर मग, जाणून घेऊया लसूण साठवण्याचे काही पारंपरिक उपाय.
1/8
स्वयंपाकघरात फोडणीचा खमंग सुवास पाहिजे असेल, तर 'लसूण' हवाच! डाळ असो वा भाजी, लसणाच्या दोन पाकळ्या पडल्या की जेवणाची चव दुपटीने वाढते. पण अनेकदा आपण बाजारातून किलोभर लसूण विकत आणतो आणि काही दिवसांतच तो सुकायला लागतो किंवा आतून काळा पडतो. गृहिणी असोत वा शेतकरी, लसूण दीर्घकाळ टिकवून ठेवणं हे एक मोठं आव्हान असतं. त्यामुळे तो साठवणं हा अनेकांसाठी डोकेदुखी असते.

advertisement
2/8
लसूण लवकर खराब का होतो? तो साठवण्याची योग्य पद्धत कोणती? वर्षभर लसणाचा ताजेपणा आणि सुगंध कसा टिकवायचा? चला तर मग, जाणून घेऊया लसूण साठवण्याचे काही पारंपरिक उपाय. लसूण खराब होण्यामागे हवामान आणि साठवणुकीची चुकीची पद्धत ही मुख्य कारणं असतात. लसूण 'फ्रेश' ठेवण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे.

3/8
1. तापमानाचे योग्य गणितलसूण साठवण्यासाठी सामान्य खोलीचे तापमान (Room Temperature) सर्वात उत्तम असते. लसूण खूप गरम किंवा खूप थंड ठिकाणी ठेवू नका. आदर्शपणे 15°C ते 18°C तापमान लसणासाठी पोषक मानले जाते. यामुळे लसूण सुकत नाही किंवा त्याला मोड (Sprouting) येत नाहीत.

4/8
2. हवा खेळती राहू द्या (Ventilation)अनेकजण लसूण प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवतात, ही सर्वात मोठी चूक आहे. लसणाला श्वास घेण्यासाठी हवेची गरज असते. काय वापरावे: जाळीदार पिशवी, बांबूची टोपली किंवा तारेच्या जाळीचे रॅक वापरा. यामुळे ओलावा साचत नाही आणि सडणारे बॅक्टेरिया वाढत नाहीत.

5/8
3. उजेड आणि सूर्यप्रकाशापासून लांब ठेवाथेट सूर्यप्रकाश लसणातील नैसर्गिक ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे तो लवकर सुकतो. तसेच जास्त प्रकाश मिळाल्यास लसणाला मोड फुटू लागतात. म्हणून, लसूण स्वयंपाकघरातील गडद कोपऱ्यात किंवा कपाटाच्या खालच्या भागात ठेवा, जिथे थेट प्रकाश पडणार नाही.

6/8
4. ओलावा: लसणाचा सर्वात मोठा शत्रूजर साठवणुकीची जागा ओली (Dampness) असेल, तर लसणाला बुरशी लागू शकते. म्हणून सिंकच्या खाली किंवा जिथे पाण्याचा वापर होतो अशा जागी लसूण ठेवू नका. कोरडी जागा लसणाचे आयुष्य वाढवते.

7/8
5. पारंपरिक 'वेणी' पद्धत (Garlic Braiding)जुन्या काळात लसूण साठवण्यासाठी त्याच्या वाळलेल्या दांड्या एकमेकांत गुंफून त्याची वेणी घातली जायची. या वेण्या थंड आणि सावलीच्या ठिकाणी लटकवल्या जातात. या पद्धतीमुळे लसणाला चहूबाजूंनी हवा लागते आणि तो 6 ते 9 महिने अगदी ताजी राहते.

8/8
6. साल काढण्याची घाई करू नकाजोपर्यंत तुम्हाला वापर करायचा नाही, तोपर्यंत लसणाचा आख्खा गड्डा फोडू नका किंवा त्याचे कागदासारखे पांढरे साल काढू नका. हे साल एक नैसर्गिक संरक्षण कवच आहे. एकदा का पाकळ्या वेगळ्या झाल्या की लसूण लवकर सुकायला सुरुवात होते.

Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement