Washim News : शेतकऱ्याला बुटाने मारहाण, कृषी अधिकाऱ्याविरोधात सरकारची कडक कारवाई
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
फळबाग योजने संदर्भात तक्रार केल्यावर पाहणी करण्यासाठी आलेल्या तालुका कृषी अधिकाऱ्याने चित्रफित काढणाऱ्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी गावात 13 जानेवारीला घडली होती
Washim News : फळबाग योजने संदर्भात तक्रार केल्यावर पाहणी करण्यासाठी आलेल्या तालुका कृषी अधिकाऱ्याने चित्रफित काढणाऱ्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी गावात 13 जानेवारीला घडली होती. या घटनेला आता चार दिवस उलटल्यानंतर कृषी विभाग खडबडुन जागे झाले आहे.कृषी आयुक्तांच्या शिफारशीवरून आता राज्य शासनाने तालुक कृषी अधिकारी सचिन कांबळेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी गावात शेतकरी ऋषिकेश पवार याने फळबाग योजने संदर्भात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पाहणी करण्यासाठी आलेल्या तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांने शेतकऱ्याला शिविगाळ करत बुटाने मारहाण केली होती. या घटनेता आता चार दिवस उलटल्यानंतर मंगरूळपीर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे याच्यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली निलंबनाची कारवाई केली आहे.
advertisement
कृषी अधिकारी सचिन कांबळेसह त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांची आणि दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची ही होणार खाते निहाय चौकशी करण्यात येणार आहे. तसेच कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्या सोबत दुर्व्यवहार करणाऱ्यावर यापुढे सक्त कारवाईचा करण्याचा इशारा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे.
शेतकऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेचा नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला. फडणवीसांचे सरकार शेतकरीविरोधी आहे, राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, दुसरे आमदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाला अंगावरचे कपडे आणि पायातील चप्पल देतो असे म्हणून अपमान करतात. नेते तर मग्रुरी करताच पण आता अधिकारीही मस्तवालपणा करु लागले आहेत, असे पटोले म्हणाले.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Washim,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 8:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Washim News : शेतकऱ्याला बुटाने मारहाण, कृषी अधिकाऱ्याविरोधात सरकारची कडक कारवाई










