पत्नीचा खतरनाक कट, बॉयफ्रेंडला करायला लावली पतीसोबत मैत्री, मरेपर्यंत दारू पाजली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पतीपासून सुटका करून घेण्यासाठी तसंच प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी दिव्याने तिचा प्रियकर पिंटूसह घृणास्पद कृत्य केलं आहे.
प्रेमात आंधळी झालेल्या पत्नीने स्वत:च्या पतीच्या हत्येचा भयानक कट रचला. पतीपासून सुटका करून घेण्यासाठी तसंच प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी दिव्याने तिचा प्रियकर पिंटूसह घृणास्पद कृत्य केलं आहे. प्लानचा भाग म्हणून पिंटू हळूहळू दिव्याचा पती नीरजसोबत जवळीक वाढवत होता. यानंतर त्याला दारूच्या पार्टीलाही बोलवायला लागला.
असंच एकदा पिंटूने नीरजला भरपूर दारू पाजली. दारू प्यायलानंतर नीरज बेशुद्ध झाला, त्यानंतर पिंटूने त्याला रिकाम्या प्लॉटवर नेलं आणि दगड-विटांनी ठेचून नीरजची हत्या केली. नीरजची हत्या केल्यानंतर पिंटू तिथून फरार झाला, पण पोलिसांच्या तपासामुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.
नीरजची पत्नी दिव्या ही दोन मुलांची आई आहे. 17 वर्षांपूर्वी नीरज आणि दिव्या यांचं लग्न झालं होतं. काही काळापूर्वी दिव्या नीरजसोबत दिल्लीला आली होती. काही काळानंतर सोशल मीडियावर दिव्याची मैत्री एटा येथील रहिवासी पिंटूसोबत झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी नीरजला संपवण्याचा कट रचला. 8 जानेवारीला नीरजला पार्टीच्या बहाण्याने पिंटू खुर्जा येथे घेऊन आला आणि त्याची नियोजनबद्ध हत्या करण्यात आली.
advertisement
तपासादरम्यान पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले. या पुराव्यांच्या आधारे, दिव्या आणि तिचा प्रियकर पिंटू यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवले आहे. खुर्जा नगर पोलीस ठाण्याचे म्हणणे आहे की या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करण्यात आले आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. याहत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
बुलंदशहरचे एसपी सिटी शंकर प्रसाद यांनी सांगितले की, नीरज हत्येचा खटला आज उलगडला आहे. नीरजची पत्नी दिव्या आणि तिचा प्रियकर पिंटू यांनी नीरजची हत्या करण्याचा कट रचला होता. सध्या पोलिसांनी दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Location :
Bulandshahr,Uttar Pradesh
First Published :
Jan 17, 2026 8:48 PM IST









