ShaniDev: 20 जानेवारी तारीख लक्षात ठेवा! उत्तराभाद्रपद नक्षत्रात शनी आल्याबरोबर 'या' राशींचे नशीब चमकणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
ShaniDev: ज्योतिषशास्त्रात शनिच्या चालीला विशेष महत्त्व आहे. शनिचे नक्षत्र परिवर्तनही राशीचक्रावर मोठा परिणाम दाखवते. दिनांक 20 जानेवारी रोजी न्यायाची देवता शनिदेव उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्राचे स्वामी स्वतः शनिदेवच असल्याने 17 मे पर्यंतचा हा काळ काही राशींसाठी अत्यंत भाग्यवान ठरेल. साधारण चार महिने शनिदेवाचा शुभ प्रभाव ज्या तीन राशींवर राहील, त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिचे हे नक्षत्र परिवर्तन करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळवून देणारे ठरेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता असून व्यापाऱ्यांना नफा कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. या काळात तुमचे अनावश्यक खर्च कमी होऊन उत्पन्नात अचानक वाढ होईल. पैतृक संपत्तीतून फायदा मिळण्यासोबतच वडिलांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील आणि आरोग्याच्या जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल.
advertisement
कर्क राशीच्या व्यक्तींची प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे आता मार्गी लागतील. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होऊन आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. येत्या चार महिन्यांत तुम्हाला मंगलकार्यात किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, जिथे जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील. विद्यार्थ्यांनाही या काळात अभ्यासात उत्तम यश मिळण्याचे संकेत आहेत.
advertisement
मकर राशीच्या लोकासाठी हे नक्षत्र परिवर्तन आत्मविश्वास वाढवणारे ठरेल. नोकरी आणि व्यापारात प्रगती झाल्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि गुप्त मार्गानेही धनलाभ होऊ शकतो. या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात दीर्घकालीन लाभ देईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि मुलांकडून एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते.
advertisement
शनिदेवाच्या या नक्षत्र परिवर्तनाचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. दर शनिवारी शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा अर्पण करा. दिव्यात थोडे काळे तीळ टाकणे अधिक शुभ मानले जाते. उत्तराभाद्रपद नक्षत्रात शनिदेव असताना दररोज 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे कार्यातील अडथळे दूर होतात.
advertisement
या काळात गरीब, गरजू किंवा मजुरांना शक्य ती मदत करा. काळे कापड, छत्री, जोडे किंवा काळ्या उडदाचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि झाडाजवळ संध्याकाळी दिवा लावा. यामुळे साडेसाती किंवा इतर दोषांचा त्रास कमी होतो. या उपायांमुळे येत्या चार महिन्यांत तुम्हाला शनिदेवाच्या नक्षत्र परिवर्तनाचे अधिक चांगले परिणाम अनुभवायला मिळतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









