Raincoat Shopping: पावसाळ्यात करा रेनकोट्सची सर्वात स्वस्त शॉपिंग, किंमत फक्त 40 रुपयांपासून, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Raincoat Shopping: सध्या पावसाळा सुरु आहे. मुंबईत याठिकाणी तुम्हाला 40 रुपयांपासून रेनकोट्स मिळतील.
मुंबई: सध्या पावसाळा सुरु आहे. मस्जिद बंदर येथील चकाला इस्टेट परिसरातील एका नामांकित दुकानात पावसाळ्यानिमित्त विशेष आकर्षक ऑफर्सची सुरुवात झाली आहे. झील, मॉडर्न, सुपर आणि वॉटर फायटर यांसारख्या लोकप्रिय ब्रँडचे प्रीमियम दर्जाचे रेनकोट्स येथे होलसेल दरात उपलब्ध करण्यात आले आहेत. या ऑफरमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठी विविध रंग, डिझाइन्स आणि साइझमध्ये रेनकोट्सचा भरगच्च संग्रह ठेवण्यात आला आहे.
सदर ठिकाणी पोंचो फक्त 40 रुपयांपासून मिळत असून 100 रुपयांपर्यंत त्याचे दर आहेत. तीन ते चार वर्षांच्या लहान मुलांसाठी आकर्षक आणि टिकाऊ रेनकोट्स केवळ 150 रुपयांपासून उपलब्ध असून ते 250 रुपयांपर्यंत जातात. मोठ्यांसाठीच्या जॅकेट्सची किंमत 300 रुपयांपासून सुरू होते आणि 1000 रुपयांपर्यंत जाते. विशेष म्हणजे झिल या ब्रँडच्या जॅकेट्सवर सध्या 15 टक्के सूट दिली जात आहे.
advertisement
ज्यांच्याकडे जॅकेट आधीपासून आहे आणि फक्त पँटची गरज आहे, अशांसाठी वेगळ्या पँट्सही येथे विक्रीस उपलब्ध असून त्यांची किंमत 250 रुपयांपासून सुरू होते. चार वर्षांच्या मुलांसाठी खास रेनकोट्स केवळ 160 रुपयांपासून मिळत आहेत.
advertisement
या दुकानातील सर्व रेनकोट्स आणि जॅकेट्स प्रीमियम दर्जाच्या साहित्यापासून तयार करण्यात आले असून, पावसात संपूर्ण संरक्षण देणारे व स्टायलिश असल्यामुळे ग्राहकांमध्ये यांना मोठी मागणी आहे. व्यापाऱ्यांसाठीही ही एक मोठी संधी असून होलसेल दरात थेट खरेदी करता येते. अल कादिर कलेक्शन हे दुकानाचं नाव आहे जे मस्जिद बंदर येथील चकाला येथे आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2025 6:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Raincoat Shopping: पावसाळ्यात करा रेनकोट्सची सर्वात स्वस्त शॉपिंग, किंमत फक्त 40 रुपयांपासून, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?

