Childrens Clothes In Mumbai: स्वस्तात खरेदी करा व्यवसायासाठी लहान मुलांचे कपडे, महिन्याला कमवा 1 लाख, मुंबईतील हे ठिकाण बेस्ट ऑप्शन, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
सध्या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या कपड्यांची मागणी असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता.
मुंबई : जर तुम्ही गृहिणी असाल, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बाळगणाऱ्या महिला असाल आणि गुंतवणूक कमी असावी असं वाटत असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. सध्या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या कपड्यांची मागणी असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी दहिसर पूर्व मध्ये सई डिझाईन्स हे होलसेल शॉप आहे. या होलसेल दुकानातून तुम्ही लहान मुलांचे पारंपरिक कपडे घेऊन व्यवसाय सुरू करू शकता.
advertisement
महिन्याला 80 ते 1 लाखापर्यंतची कमाई
या दुकानात मुलींसाठी परकर-पोलके, शिवलेली साडी, वारी स्टाइलचे ड्रेस आणि मुलांसाठी धोतर-कुर्ता, नऊवारी साडी अशा विविध पारंपरिक पोशाखांचा समावेश आहे. हे सर्व कपडे तुम्हाला होलसेल दरात केवळ 300 रुपये ते 450 रुपये दरम्यान मिळतात. विशेष म्हणजे, सणासुदीच्या काळात या कपड्यांना जबरदस्त मागणी असते. त्यामुळे महिन्याला 80 हजार ते 1 लाख रुपये कमवू शकता.
advertisement
सणानुसार ट्रेडिंग कपडे
सध्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वारी स्पेशल ड्रेस तयार केले असून, बाजारात त्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे आता वारी, रक्षाबंधन, गणपती या सणांना सुरुवात झाली आहे. ग्राहकांना वारी स्पेशल, गणपती स्पेशल कपडे खरेदी करण्याची हौस असते. त्यामुळे या कपड्यांचा व्यवसाय सुरू करून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता.
advertisement
या यशस्वी संकल्पनेचं मूळ आहे उद्योजिका विनया विचारे यांच्याकडे. त्यांनी 12 वर्षांपूर्वी घरच्या घरी शिलाई मशीनवरून सुरुवात केली. त्यांच्या हटके डिझाईन्सनी ग्राहकांचं लक्ष वेधलं आणि हळूहळू त्यांनी स्वतःचा शॉप सुरू केला. आज त्यांच्या यशस्वी व्यवसायात 15 महिला काम करत असून, विनया यांचं काम अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विनया विचारे केवळ व्यवसाय चालवत नाहीत, तर नवोदित महिला उद्योजिकांना मार्गदर्शनही करतात.
advertisement
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 29, 2025 11:53 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Childrens Clothes In Mumbai: स्वस्तात खरेदी करा व्यवसायासाठी लहान मुलांचे कपडे, महिन्याला कमवा 1 लाख, मुंबईतील हे ठिकाण बेस्ट ऑप्शन, Video

