प्रत्यक्षात केस किती लवकर वाढतील हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. जसं की आहार, केसांची काळजी आणि आपला हेअर केअर रूटीन. तरीसुद्धा खुले केस चांगले की बांधलेले, हा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊ दोन्ही प्रकारचे फायदे-तोटे
केस खुले ठेवल्यास
जर तुम्ही केस नेहमीच मोकळे ठेवले, तर त्यांचा थेट धूळ, प्रदूषण आणि उन्हाशी संपर्क येतो. त्यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलसरपणा कमी होतो, केस कोरडे पडतात, कोंडा वाढतो आणि तुटण्याची समस्या वाढते. सतत खुले ठेवल्याने केस कमकुवत होतात आणि गळतीही वाढते. त्यातच धुळेमुळे केस गुंततात, गाठी पडतात आणि विंचरताना केस तुटतात. त्यामुळे केसांची वाढ मंदावते.
advertisement
केस बांधले तर
केस बांधून ठेवले तर त्यांचे संरक्षण चांगले होते. चोटी, पोनीटेल किंवा जूडा केल्याने केस धूळ-मातीपासून वाचतात आणि गुंता होत नाही. पण केस खूप घट्ट बांधले तरही धोका असतो. टाइट पोनीटेल किंवा घट्ट केस केल्याने टाळूवर ताण येतो, केसांच्या मुळांना (follicles) नुकसान पोहोचतं आणि त्यामुळे केस गळतात किंवा पातळ होतात.
योग्य उपाय कोणता?
केसांच्या वाढीसाठी संतुलन सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजेच केस न नेहमी खुले ठेवावेत, न खूप घट्ट बांधावेत.
घरी असताना हलकीशी वेणी किंवा सैलसा जूडा करावा.
झोपताना केस मोकळे ठेवण्यापेक्षा हलकी वेणी बांधावी, यामुळे केस गुंते नाहीत आणि तुटतही नाहीत.
बाहेर जाताना उन्हापासून आणि प्रदूषणापासून संरक्षणासाठी स्कार्फ किंवा दुपट्ट्याने केस झाकलेचे चांगले.
केस वाढीसाठी आणखी काही टिप्स
संतुलित आहार घेणे, नियमित तेलाने मसाज करणे, आठवड्यातून एकदा हेअर मास्क वापरणे, हलक्या हाताने केस विंचरणे
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)