बायोटिन हा केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पोषक घटक आहे. नैसर्गिक आणि वनस्पती-आधारित बायोटिन पूरक आहार केसांसाठी महत्त्वाचा असतो. यासाठी, आहारात पाच पदार्थांचा समावेश केला तर उपयोग होईल. नैसर्गिक बायोटिन असलेल्या पदार्थांबद्दल जाणून घेऊया. या टिप्स विशेषत: शाकाहारींसाठी महत्त्वाच्या आहेत. कारण मांसाहार करणाऱ्यांसाठी अंडी, मासे असे पर्याय उपलब्ध असतात.
Skin Care: झटपट पटापट फेसपॅक, सर्व प्रकारच्या त्वचेला होईल सूट
advertisement
अॅव्होकॅडो - हे फळ इतर फळांच्या तुलनेत क्रिमी आणि पौष्टिक आहे. हेल्दी फॅट्सबरोबरच प्रत्येक फळात 3-6 मायक्रोग्राम बायोटिन देखील असतं. व्हिटॅमिन बी5 आणि व्हिटॅमिन ई असलेले हे पोषक घटक केसांच्या वाढीला मदत करतात आणि केसांना ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि तणावापासून वाचवतात.
रताळं - रताळ्यात अनेक पोषक घटक असतात. एका मध्यम आकाराच्या रताळ्यात 2-3 मायक्रोग्राम बायोटिन असतं. आपले शरीर सामान्यतः बीटा-कॅरोटीनचं रुपांतर व्हिटॅमिन ए मधे करतं आणि सेबम उत्पादनाला उत्तेजन देतं, ज्यामुळे आपल्या टाळूला मॉइश्चरायझेशन मिळतं आणि टाळू निरोगी स्वच्छ राहतो.
पालक - पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या अत्यंत पौष्टिक असतात आणि एक कप कच्च्या पालकामधे सुमारे 12 मायक्रोग्रॅम बायोटिन असतं. यात व्हिटॅमिन ए आणि सी उपलब्ध असतं. यामुळे कोलेजनचं उत्पादन वाढतं आणि टाळूचं आरोग्य चांगलं राहतं. केसांच्या नैसर्गिक वाढीला यामुळे चालना मिळते.
Blood Pressure: व्हाईट कोट हायपरटेन्शन म्हणजे काय ? रक्तदाब नियंत्रण शक्य आहे ?
मशरूम - मशरूममधे प्रत्येक सर्व्हिंगमधे 2-6 मायक्रोग्राम बायोटिन असतं. मशरूममध्ये कॉपर भरपूर प्रमाणात असतं, यामुळे मेलेनिनच्या निर्मितीला मदत होते. मशरूम खाल्ल्यानं केस लांब, मजबूत आणि काळे केस होतात.
सुकामेवा - बदाम आणि अक्रोड सारखा सुकामेवा तुमच्या दैनंदिन आहारात बायोटिनसाठीचा एक सोयीस्कर आणि पौष्टिक मार्ग आहे. यात प्रति औंस सुमारे 1-2 मायक्रोग्राम बायोटिन असतं. बदामांमधे व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं, केसांच्या ऊतींची दुरुस्ती आणि निर्मिती करण्यासाठी याची मदत होते. अक्रोडात ओमेगा-3 असतं, यामुळे टाळूचं आरोग्य आणि केसांची वाढ चांगली होते.
