याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध, फिस्टुला किंवा फिशर होऊ शकतात. यासाठी केवळ औषधं हाच उपाय नाही तर इतरही उपाय फायदेशीर ठरु शकतात.
अमेरिकेतील प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉ. मँडेल यांनी काही सोप्या पद्धती सुचवल्या आहेत. बऱ्याच काळापासून असलेल्या बद्धकोष्ठताही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय यामुळे दूर होऊ शकेल.
Happy Hormone : हॅपी हार्मोन म्हणजे काय ? आनंदी राहण्यासाठी काय करायचं ?
advertisement
डॉ. मँडेल यांच्या मते, दररोज पोट स्वच्छ ठेवायचं असेल तर सुकं आलं म्हणजेच सुंठ खा. यासाठीची पद्धत त्यांनी सांगितली आहे. रात्रभर कोमट पाण्यात सुंठाचे दोन-तीन तुकडे भिजत ठेवा. ते पाणी प्या आणि सकाळी सुंठ खा.
याव्यतिरिक्त, सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि थोडं लिंबू मिसळून घ्या. यामुळे पचनसंस्था सक्रिय होते आणि मल मऊ होतो आणि ते सहजतेने निघण्यास मदत होते. अर्ध लिंबू कोमट पाण्यात पिळून प्यायल्यानं पोट स्वच्छ होतंच शिवाय विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. लिंबूमधील सायट्रिक आम्ल आतड्यांमध्ये अडकलेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं, ज्यामुळे शरीर हलकं आणि ऊर्जावान वाटतं.
Ear Care : कान बंद होण्यावर रामबाण उपाय, बंद कान उघडण्यासाठी या उपयुक्त टिप्स वापरा
सकाळी रिकाम्या पोटी दोन-तीन चमचे कोरफडीचा रस प्यायल्यानं आतडी मऊ होतात आणि पचन सुधारतं.
एप्सन सॉल्टमधील मॅग्नेशियम आतड्यांतील स्नायूंना सक्रिय करतं. दोन चमचे एप्सन सॉल्ट एक कप पाण्यात मिसळून प्या. पोटात आम्लता असेल तर कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा विरघळवा.
Dandelion Tea देखील नैसर्गिक रेचक म्हणून काम करतं... तुम्ही ते दिवसातून दोन-तीन वेळा पिऊ शकता.
सकाळी एक कप कॉफीमुळे पचनक्रिया सक्रिय होते. पण जास्त कॅफिनमुळे डिहायड्रेशन वाढू शकते, म्हणून पाणी पिण्यास विसरू नका.