आज, हृदयरोग हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. हृदयरोग मुख्यत्वे जीवनशैलीशी संबंधित आहे, म्हणजेच आपण आपल्या सवयी सुधारून आपले हृदय दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकतो. हृदयाचं सर्वात जास्त नुकसान करणाऱ्या सवयी कोणत्या आहेत. हृदयरोग टाळण्यासाठी कोणत्या सवयी टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
Face care : मधानं चेहरा दिसेल सुंदर, फ्रेश, वाचा मधाचे चेहऱ्यासाठी आणखी फायदे
advertisement
धूम्रपान - धूम्रपानाचा केवळ फुफ्फुसांवरच नव्हे तर हृदयावरही नकारात्मक परिणाम होतो. सिगारेटच्या धुरातील निकोटीन आणि कार्बन मोनोऑक्साइडमुळे रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि रक्तवाहिन्यांच्या भिंतींचं नुकसान होतं. यामुळे, धमन्यांमधे प्लेक जमा होण्याची प्रक्रिया वेगानं होते, ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. धूम्रपानाची सवय सोडणं आव्हानात्मक असू शकतं, पण वैद्यकीय मदतीनं वाईट सवय सोडण्यास मदत होऊ शकते.
प्रक्रिया केलेले अन्न खाणं - पॅक केलेले चिप्स, साखरयुक्त पेयं, फ्रोजन फूड आणि फास्ट फूड हे अल्ट्रा-प्रोसेस्डश्रेणीत येतात. त्यात सोडियम, चरबी आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं. जास्त मीठामुळे रक्तदाब वाढू शकतो, तर ट्रान्स फॅटमुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि रक्तवाहिन्या बंद होऊ शकतात. म्हणून, आहारात धान्य, ताजी फळं, भाज्या आणि सुकामेव्याचा समावेश करा. ताजं, घरी शिजवलेलं अन्न हृदयासाठी सर्वोत्तम आहे.
Planks : पोट, बांधा राहिल सडपातळ, दिवसाच्या सुरुवातीला करा प्लांक एक्सरसाईज
मद्यपान - मर्यादित प्रमाणातलं अल्कोहोल हानिकारक नाही असं वाटत असेल तर तो गैरसमज आहे. पण हृदयाच्या बाबतीत एक पेय देखील धोकादायक ठरु शकतं. अल्कोहोल हृदयाच्या स्नायूंना कमकुवत करू शकतं.
यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि ट्रायग्लिसराइडची पातळी वाढू शकते. यामुळे वजन देखील वाढते, ज्यामुळे हृदयावर दबाव येतो.
बैठी जीवनशैली - तासन्तास खुर्चीवर बसणं किंवा व्यायाम न करणं म्हणजेच सक्रिय नसण्यानं चयापचय क्रिया मंदावतं. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो, हे तिन्ही हृदयरोगासाठी धोकादायक घटक आहेत. म्हणून, दररोज किमान तीस मिनिटं चालणं, योगासनं किंवा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा आणि कामाच्या दरम्यान स्ट्रेचिंग करत रहा.
