विशेषतः आयुर्वेदात तूप वापरण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत. यातल्या सात पद्धती आणि त्यांचे फायदे समजून घेऊया.
सकाळी रिकाम्या पोटी तूप घ्या - दिवसाची सुरुवात तुपानं करण्याची शिफारस आयुर्वेदात करण्यात आली आहे. हे अत्यंत फायदेशीर पेय आहे. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप मिसळून ते प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते. तुपामुळे आतड्यांना वंगण मिळतं, यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि वात दोष संतुलित करण्यात मदत होते. वारंवार पोट फुगणं, गॅस असा त्रास होत असेल तर ही पद्धत त्यांना फायदेशीर ठरू शकते.
advertisement
Teck Neck : टेक नेक म्हणजे काय ? मानेला त्रास का होतो ? मानदुखी कमी कशी करायची ?
रात्री दुधासोबत तूप पिणं - झोपण्यापूर्वी अर्धा किंवा एक चमचा तूप कोमट दुधात मिसळून प्यायल्यानं झोप येते असं मानलं जातं. अशा प्रकारे तूप सेवन केल्यानं शरीराच्या ऊतींचं पोषण होतं, मन शांत होतं आणि शरीराला आराम मिळण्यास मदत होते.
तुपाचा वापर करुन ऑईल पुलिंग - ऑईल पुलिंगविषयी तुम्ही ऐकलं आहे का, यात तेलाचा वापर मौखिक आरोग्यासाठी केला जातो. तसाच प्रकार तूप वापरुन केला जाऊ शकतो. यासाठी तूप थोडंसं कोमट करा. दररोज सकाळी ते काही मिनिटं तोंडात ठेवा आणि धुवा. या पद्धतीला ऑईल पुलिंग म्हणतात. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात, तोंडातील कोरडेपणा दूर होतो, दातांचा पिवळेपणा कमी होतो आणि तोंडाची दुर्गंधी देखील कमी होते.
नस्य थेरपी - आयुर्वेदात तूप नस्य थेरपीचा वापर केला जातो. नाकात दोन-तीन थेंब कोमट तूप टाकलं जातं. यामुळे नाक ओलसर राहण्यास मदत होते आणि कोरडेपणा किंवा जळजळ कमी होते.
Health Tips : बहुगुणी, बहुपयोगी औषधी वनस्पती, सविस्तर वाचा भृंगराजची उपयुक्तता
नाभीत तूप वापरणं - नाभी ही आपल्या शरीरातील अनेक ऊर्जा वाहिन्यांचं केंद्र आहे. नाभीवर तूप लावल्यानं पचनक्रिया संतुलित होण्यास मदत होते. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटफुगी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
सांध्यांच्या मालिशसाठी तूप - कोमट तुपानं सांध्यांची मालिश केल्यानं सांध्यांचा कडकपणा आणि वेदना कमी होतात. त्यामुळे सूज कमी होण्यास आणि सांध्यांची लवचिकता पुनर्संचयित होण्यास मदत होते.
भाजणं किंवा इतर जखमांसाठी - किरकोळ भाजलेल्या, कापलेल्या किंवा फाटलेल्या ओठांवर शुद्ध तूप लावल्यानं त्वचा जलद बरी होते आणि संसर्ग रोखला जातो.