Teck Neck : टेक नेक म्हणजे काय ? मानेला त्रास का होतो ? मानदुखी कमी कशी करायची ?

Last Updated:

काम करताना, मान वाकवून ठेवल्यानं किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर जास्त वेळ काम केल्यानं सूज, कडकपणा आणि कधीकधी दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो. टेक नेक म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती आणि टेक नेक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची समजून घेऊया.

News18
News18
मुंबई : कामाचा भाग असल्यानं तुम्ही लॅपटॉपवर तासनतास काम करत असाल किंवा तुमचा फोन पाहत असाल, तर आताच सावध व्हा कारण "टेक नेक" ची समस्या होण्याची शक्यता अधिक आहे.
काम करताना, मान वाकवून ठेवल्यानं किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर जास्त वेळ काम केल्यानं सूज, कडकपणा आणि कधीकधी दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो. टेक नेक म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती आणि टेक नेक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची समजून घेऊया.
advertisement
टेक नेकची लक्षणं -
डोकेदुखी
पाठीत कडकपणा जाणवणं
जबडा दुखणं
हातात मुंग्या येणं किंवा हात सुन्न होणं
हातात कमकुवतपणा जाणवणं
टेक नेक टाळण्यासाठी काय करायचं ?
- डिव्हाइसपासून योग्य अंतर ठेवा - केवळ तुमच्या डिव्हाइसवर जास्त वेळ काम केल्यानं नाही तर चुकीच्या स्थितीत राहिल्यानं देखील ही समस्या जाणवते. म्हणून, काम करताना तुमचा फोन योग्य पातळीवर ठेवा आणि डिव्हाइस वापरताना कधीही मान वाकवू नका.
advertisement
- विश्रांती घ्या - दर तासाला छोटा ब्रेक घ्या आणि थोडी पाववं चाला. स्ट्रेचिंग केल्यानंही ताणलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते आणि मान किंवा पाठीचा कडकपणा कमी होतो.
- कमी स्क्रीन टाइम - कामासाठी स्क्रीन वापरावं लागेल, पण कामानंतर तुमचा स्क्रीन टाइम मर्यादित करा. मोकळ्या वेळात छंद जोपासण्याला भर द्या.
advertisement
टेक नेक कमी करण्यासाठी उपाय -
चिन टक: उभं असताना किंवा बसून हा व्यायाम करू शकता. डोकं मागे झुकवा, म्हणजे डबल चीन बनवत आहात या स्थितीत आणि डोकं पुढे ढकलत राहा. या दरम्यान डोकं मागे झुकवू नका. या स्थितीत पाच सेकंद राहा आणि नंतर पुन्हा करा.
advertisement
हात - कान ताणणं: उजव्या हाताचा तळवा तुमच्या डोक्याच्या बाजूला ठेवा. हातावर दाब देऊन, डोकं तुमच्या उजव्या खांद्याकडे झुकवण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत पाच सेकंद राहा आणि नंतर पुन्हा करा.
भुजंगासन - जमिनीवर पोटावर झोपा. डोकं खाली ठेवा. दोन्ही हातांनी कमीत कमी आधार देऊन, डोकं आणि छातीचा वरचा भाग वर उचला. पंधरा ते तीस सेकंद याच स्थितीत राहा. यामुळे पाठ आणि मान उलट स्थितीत ताणली जाईल ज्यामुळे टेक नेक येतो. यामुळे असंतुलनाची समस्या कमी होईल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Teck Neck : टेक नेक म्हणजे काय ? मानेला त्रास का होतो ? मानदुखी कमी कशी करायची ?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement