बाजारात अनेक उत्पादनं असली तरी त्यातल्या रसायनांमुळे त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात. अशावेळी, स्वयंपाकघरातील तूप या समस्येवरच चांगलं आणि परिणामकारक औषध आहे. तुपामधे जीवनसत्त्वं अ, ड, ई आणि के, ओमेगा-3 आणि ओमेगा-9 फॅटी एसिड आढळतात. हे सर्व घटक त्वचा निरोगी आणि दुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
Licorice: गुणकारी ज्येष्ठमध, घशाच्या समस्यांवर हमखास उपाय, नक्की वापरुन पाहा
advertisement
त्वचेसाठी तुमचं नाईट केअर रुटिन असेल तर त्यात तूप पण वापरुन पाहा. त्वचा तज्ज्ञांच्या मते, रात्री नाईट क्रीम म्हणून तूप लावणं खूप फायदेशीर आहे. झोपण्यापूर्वी तूप लावल्यानं कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेला चमक येण्यास मदत होते.
तूप लावण्यासाठी, आधी त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा आणि बोटांनी त्वचेवर तुपाचा मसाज करा. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहील आणि केमिकलयुक्त मॉइश्चरायझर्स वापरण्याची गरज भासणार नाही.
Skin Care: घरी तयार करा कोरियन ग्लास क्रिम, जाणून घ्या क्रिम बनवण्याची पद्धत
हिवाळ्यात बॉडी मसाज करणं फायदेशीर मानलं जातं. यासाठी तुपाचा वापर करू शकता. यामुळे त्वचेला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळतात. मालिशसाठी, तूप थोडंसं गरम करा आणि संपूर्ण शरीरावर लावा.
बाळांना तुपानं मालिश करणं खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात टाचांना भेगा पडतात. यासाठीही तूप वापरू शकता. रात्री झोपण्यापूर्वी, टाचा कोमट पाण्यानं स्वच्छ करा, नंतर त्यावर तुपाचा थर लावा आणि झोपा. सकाळी कोमट पाण्यानं पाय धुवा. हे नियमितपणे केलं तर टाचा मऊ व्हायल मदत होईल.
