लठ्ठपणाचा परिणाम इतका खोलवर असतो की कधीकधी रोगाची लक्षणं दिसण्यापूर्वीच शरीराच्या कामांवर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होते. वाढत्या वजनाचा आणि पाच प्रमुख आजारांमधला थेट संबंध समजून घेऊया.
मधुमेह - पोट आणि कंबरेभोवती साठलेल्या चरबीमुळे शरीराची इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते. याचा अर्थ शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, ज्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते. चरबीत असणाऱ्या, रसायनांमुळे इन्सुलिनच्या कार्यात व्यत्यय येतो. त्यामुळे अनेकांना आहारावर नियंत्रण ठेवूनही रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार जाणवतात.
advertisement
Ghee Benefits: घरगुती मॉईश्चरायझर - तूप, त्वचा - केसांसाठी दर्जेदार उपाय
हृदयरोग - वजन केवळ पाच - दहा टक्के कमी केल्यानं रक्तातील साखर नियंंत्रणात लक्षणीय सुधारणा होऊ शकते. हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि हार्ट फेल्युअर यासाठी लठ्ठपणा हा एक प्रमुख जोखीम घटक मानला जातो. बॉडी मास इंडेक्स (BMI) जसजसा वाढत जातो तसतसा तुमच्या हृदयावर ताण येतो. यामुळे शरीरात रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्त काम करावं लागतं.
शरीरातील चरबी धमन्यांमधे जमा होते आणि प्लेक तयार होतो, ज्यामुळे रक्तप्रवाह रोखला जाऊ शकतो. सध्या अगदी लहान वयातही उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या वाढत आहेत, उपचार केले नाहीत तर या स्थितीमुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होऊ शकतो. या धोक्यांचं लवकर निदान करण्यासाठी नियमित रक्त चाचण्या, ईसीजी आणि रक्तदाब निरीक्षण आवश्यक आहे.
कर्करोग - लठ्ठपणामुळे स्तन, कोलन, गर्भाशय, मूत्रपिंड आणि अन्ननलिका यासह अनेक प्रकारच्या कर्करोगांचा धोका वाढतो असे अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे. यामागची कारणं समजून घेऊया -
शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढणं
सततचा सूज
पेशींच्या वाढीवर परिणाम
रजोनिवृत्तीनंतर वजन वाढल्यानं महिलांमधे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
पुरुष आणि महिला दोघांमध्येही अवयवांभोवती जमा होणारी व्हिसेरल फॅट विशेषतः धोकादायक मानली जाते कारण ती कर्करोगाला चालना देणारे हार्मोन्स आणि प्रथिनं तयार करते.
यकृत - NAFLD म्हणजेच नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज ही यकृताची व्याधी आहे. अल्कोहोल न पिणाऱ्यांनाही हा धोका आहे. यकृताच्या पेशींमधे जास्त चरबी जमा होते, ज्यामुळे सूज येते आणि अखेरीस फायब्रोसिस किंवा डाग पडतात.
Licorice: गुणकारी ज्येष्ठमध, घशाच्या समस्यांवर हमखास उपाय, नक्की वापरुन पाहा
उपचार केले नाहीत तर यामुळे सिरोसिस किंवा यकृत निकामी होऊ शकतं. सत्तर-नव्वद टक्के लठ्ठ लोकांमधे फॅटी लिव्हर आढळतं आणि सुमारे तीस टक्के प्रकरणांमधे याचं स्वरुप गंभीर होऊ शकतं. बदलत्या जीवनशैलीमुळे, मुलांमधे आणि किशोरवयीन मुलांमधेही याचं प्रमाण वेगानं वाढतंय ही चिंतेची बाब आहे.
सांधेदुखी - वय किंवा कमकुवतपणामुळेच सांधेदुखी होते असं नाही तर वजनामुळेही हा त्रास होऊ शकतो. प्रत्येक अतिरिक्त किलोग्रॅम वजनामुळे गुडघ्यांवर अंदाजे चार पट जास्त दबाव येतो. यामुळे हळूहळू, कूर्चा झिजते, ज्यामुळे बराच काळ वेदना होतात, पायात कडकपणा जाणवतो आणि चालायला त्रास होतो.
वजन कमी करण्यासोबत स्नायूंसाठी उपयुक्त हलके व्यायाम केल्यानं वेदना बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात आणि अनेकदा औषधांची गरज कमी होते.
