लसणामुळे वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात कसं येतं ?
लसणामध्ये असलेला अॅलिसिन हा घटक यात महत्त्वाचा आहे. अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असल्यानं वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करुन चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करणं, धमन्यांमध्ये जमा झालेले थर साफ करण्यास मदत होते.
रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
advertisement
Hair Growth : घनदाट केसांसाठी हा उपाय नक्की करा, केस होतील लांब आणि मजबूत
हृदय निरोगी ठेवण्यासाठी लसणाचा उपयोग
लसणामुळे रक्तदाब नियंत्रित करता येतो. रक्तवाहिन्या स्वच्छ राहण्यासाठी याचा उपयोग होतो आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो. रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता कमी करता येते, लसणामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो.
लसूण खाण्याची योग्य पद्धत
1. रिकाम्या पोटी कच्चा लसूण खा.
सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या चावल्यानं त्यातील पोषक तत्व थेट रक्तात शोषली जातात. यामुळे हृदय मजबूत होतं आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.
2. मधासह लसूण खा.
लसूण मधात मिसळून खाणं अधिक प्रभावी आहे, कारण यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होऊ शकते.
Kidney Failure : मूत्रपिंडं निकामी होण्यापासून रोखा, आजपासूनच काळजी घ्या
3. लसूण पाणी प्या.
एक ग्लास कोमट पाण्यात लसणाची एक पाकळी मिसळून ते प्यायल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो.
4. लसूण जास्त शिजवणं टाळा.
जास्त शिजवल्यानं लसणातील पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे लसूण थोडा तळून किंवा सॅलडमध्ये कच्चा घालून खा. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची समस्या टाळण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी लसूण खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. पण, यासाठी लसूण योग्य पद्धतीनं खाणं महत्वाचं आहे. रोजच्या आहारात याचा समावेश केला तर हृदयाचं आरोग्य आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारेल.