बागेश्वर (उत्तराखंंड): आरोग्य टिकवण्यासाठी काही पारंपरििक घरगुती उपाय खूपच प्रभावी असू शकतात, ज्यामध्ये गिलोय किंवा Giloy या वनौषथीचा समावेश होतो. साध्या तापापासून ते डायबेटिसपर्यंत अनेक आजारांवर चांगला गुण देणारं औषध आहे ही वनस्पती. या वनस्पतीच्या पानांपासून मुळापर्यंत सगळे भाग उपयोगी असतात. पारंपरिक आजीबाईच्या बटव्यात या औषधीला मानाचं स्थान होतंं. या Giloy ला मराठीत काय म्हणतात माहीत आहे?
advertisement
गिलोयचा मराठीत अर्थ गुळवेल. गुळवेलीची पानं, मूळ आणि खोड असे सगळेच भाग अनेक आजारांवर उपयुक्त ठरतात. गुळवेलीमध्ये असे गुणधर्म असतात, जे ताप, पिवळ्या काविळ, संधिवात, मधुमेह, बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि अपचन यांसारख्या विकारांवर उपचार करण्यास मदत करतात. गुळवेल वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे नियंत्रण करण्याची क्षमता ठेवतो.
गुळवेलीचे फायदे
गुळवेल ही एक वेलीप्रकारची वनस्पती आहे, जी सामान्यतः जंगलांमध्ये आढळते. प्राचीन काळापासून गुळवेलाचा वापर आयुर्वेदिक औषध म्हणून केला जात आहे. कोविडच्या काळात गुळवेलाच्या अनेक फायद्यांबद्दलही ऐकायला मिळाले होते. आता लोकांनी ती आपल्या घरांमध्ये देखील लावायला सुरुवात केली आहे.
औषधी वनस्पती म्हणून गुळवेलचा वापर
आयुर्वेदिक तज्ज्ञ ऐजल पटेल यांच्या मते, गुळवेल आपल्या शरीरासाठी विविध प्रकारे फायदेशीर ठरू शकते, परंतु त्याचा वापर आवश्यकतेनुसारच करावा. अधिक प्रमाणात वापरल्यास ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. डॉ. पटेल Local18 शी बोलतान म्हणाले की, गुळवेल सामान्यतः जंगलात आढळणारी एक वेल असून प्राचीन काळापासून तिचा औषधी वनस्पती म्हणून वापर केला जात आहे. विशेषत: डोंगराळ भागात गुळवेल मुबलक प्रमाणात आढळते आणि तेथील लोक अनेक वर्षांपासून याचा औषध म्हणून वापर करत आहेत. गुळवेलचा स्वाद कडू असला तरी त्याचे फायदे अमूल्य आहेत.