यासाठी आंघोळीसाठी साबणाऐवजी मुलतानी मातीचा वापर करा. मुलतानी मातीचा वापर बऱ्याच काळापासून सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. मुलतानी मातीचा फेस मास्कही उपयुक्त आहे. या नैसर्गिक उपायानं त्वचेशी संबंधित अनेक समस्या कमी होतात.
विशेषतः उन्हाळ्यात, मुलतानी मातीचा वापर त्वचेला थंडावा आणि ताजेपणा देण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणूनच केवळ चेहऱ्यावर न लावता संपूर्ण शरीरावर मुलतानी माती लावणं हा चांगला पर्याय आहे.
advertisement
Summer Diet : तेलकट पदार्थांना करा बाय बाय, उन्हाळ्यात पचनसंस्थेवरचा ताण असा टाळा
उन्हाळ्यात मुलतानी मातीचे फायदे
1. त्वचेला थंडावा देण्यासाठी उपयुक्त -
उन्हाळ्यात मुलतानी मातीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. मुलतानी मातीनं आंघोळ केल्यानं शरीर थंड होतं. उन्हाळ्यात उष्णतेमुळे पुरळ किंवा मुरुम येत असतील तर मुलतानी मातीनं आंघोळ केल्यानं आराम मिळू शकतो.
2. त्वचा स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर -
मुलतानी मातीमुळे त्वचेची खोलवर स्वच्छता करण्यासाठी मदत होते. त्वचेची छिद्र मोकळी करण्यासोबतच त्वचेवरचं अतिरिक्त तेल आणि धूळ देखील काढून टाकली जाते. यामुळे त्वचा उजळते आणि मृत त्वचेच्या पेशी देखील निघून जातात. या मातीचा नियमित वापर केल्यानं त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.
3. टॅनिंग कमी करण्यासाठी उपयुक्त -
उन्हाळ्यात, सूर्यप्रकाशामुळे हात आणि पायांवर टॅनिंग होतं. मुलतानी मातीनं आंघोळ केल्यानं टॅनिंग कमी होतं. त्वचेचा रंग सुधारण्यासाठी तसंच त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठीही याची मदत होते.
4. त्वचेचा पोत सुधारतो -
मुलतानी मातीमुळे शरीराला थंडावा मिळतोच तसंच त्वचा मऊ होते. याच्या वापरानं त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझ्ड वाटते.
5. त्वचेचा रंग सुधारतो -
उन्हाळ्यात टॅनिंगमुळे त्वचेचा रंग बदलतो. मुलतानी मातीनं त्वचेची खोलवर स्वच्छता करण्यासोबतच टॅनिंगही कमी करता येतं. मुलतानी मातीच्या नियमित वापरानं त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते.
Summer Skincare : उन्हाळ्यात असा करा ई व्हिटॅमिनचा वापर, सूर्यप्रकाशापासून होईल त्वचेचं रक्षण
या गोष्टी लक्षात ठेवा -
1. त्वचा खूप कोरडी असेल तर मुलतानी मातीनं आंघोळ करणं टाळावं. कारण यामुळे त्वचेचं नैसर्गिक तेल देखील काढून टाकलं जाण्याची शक्यता असते.
2. आंघोळ केल्यानंतर, चांगलं मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहील.
3. त्वचा संवेदनशील असेल तर प्रथम एक छोटी पॅच टेस्ट करा. यामुळे त्वचेवर कोणतीही प्रतिक्रिया आली मुलतानी मिट्टी वापरू नका.
4. त्वचेची ऍलर्जी किंवा संसर्ग असेल, तर मुलतानी माती वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.