पण हीच साखर, आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही. विशेषतः सामान्यतः वापरली जाणारी प्रक्रिया केलेली साखर ही अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रियांनंतर तयार केली जाते. आपल्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर, मेंदूच्या कार्यावर देखील याचा परिणाम होतो.
Diet Tips : कोमट पाण्यात जिरं, लिंबू घालून पिण्याचे फायदे, अनेक आरोग्य समस्या राहतील दूर
advertisement
अलिकडेच सोशल मीडियावर, न्यूरोसर्जन डॉ. संदीप मावानी यांनी एका पोस्टमध्ये साखर न खाण्याचा काय परिणाम होतो याविषयी माहिती सांगितली आहे. दोन आठवडे आहारात साखर खाणं बंद केलं तर मेंदूवर काय परिणाम होतो याविषयी ही माहिती आहे.
साखर हा एक सायकोएक्टिव्ह पदार्थ आहे.साखर तुमच्या शरीरावर औषधासारखा परिणाम करतो. यामुळेच आपल्याला साखरेचं व्यसन वाटतं. चॉकलेट खाल्लं तर तुमचा मेंदू दोन तासांसाठी मंदावतो.
साखर सोडण्याचा मेंदूवर होणारा परिणाम
साखर खाणं सोडल्यानं पहिले तीन दिवस त्रास होऊ शकतो. यामुळे डोकेदुखी, थकवा, चिडचिडेपणा जाणवू शकतो. यावेळी मेंदू पुन्हा काम करत असतो आणि त्यामुळेच अशा समस्या जाणवू शकतात. मेंदूत सूज आली असेल तर ती चार दिवसांत कमी होण्यास सुरुवात होईल आणि त्यामुळे स्मरणशक्ती बारा टक्क्यांनी वाढू शकते.
Hair Care : केसांच्या आरोग्यासाठी वापरा भेंडी, पावसाळ्यातल्या केस गळतीवर उपाय
साखर बंद केल्यानं मूड स्विंग्स कमी होतील आणि भूक देखील नियंत्रणात राहील. याचे, खरे फायदे दोन आठवड्यांनंतर दिसू लागतील. साखर सोडल्यानंतर दोन आठवड्यांनंतर, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता 30 टक्क्यांनी सुधारेल आणि तणाव 40 टक्क्यांनी कमी होईल. झोप देखील सुधारेल.
साखर सोडण्याचे इतर फायदे -
- साखर सोडल्यानं कॅलरीजचं प्रमाण कमी होतं आणि वजन कमी होण्यास मदत होते.
- साखर खाल्ल्यानंतर शरीराची ऊर्जा पातळी वेगानं वाढते आणि कमी होते. साखर सोडल्यानं ऊर्जा पातळी अधिक संतुलित राहते.
- साखर सोडल्यानं मुरुमे आणि सुरकुत्या यासारख्या त्वचेशी संबंधित समस्या कमी होतात.
- साखर सोडल्यानं मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन सुधारतं.
- जास्त साखर खाल्ल्यानं शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते आणि साखर सोडल्यानं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.