TRENDING:

Hair Care : केसांच्या आरोग्यासाठी वापरा भेंडी, पावसाळ्यातल्या केस गळतीवर उपाय

Last Updated:

बाजारात उपलब्ध असलेल्या केसांच्या उत्पादनांऐवजी घरगुती केसांची उत्पादनं वापरायची असतील तर ही माहिती महत्त्वाची आहे. कारण स्वयंपाकघरातलाच एक जिन्नस यासाठी उपयोगी ठरतो. भेंडी ही भाजी केसांच्या आरोग्यासाठी वरदान आहे. तिचा वापर कसा करायचा हे समजून घेऊया. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पाऊस म्हटलं की आरोग्याच्या समस्या वाढतात. त्यात तुम्ही बाहेर जात असाल तर अंग, केस ओलं होण्यानंही सर्दीसारख्या समस्या जाणवतात. पावसात आणखी एक समस्या जाणवते ती म्हणजे केसं गळणं. आर्द्रता वाढल्यानं, केसांत बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
News18
News18
advertisement

सतत केस गळणं हे चिंतेचं कारण आहे. डोक्यातील कोंड्याची समस्या खूप सामान्य आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही समस्या जाणवते. बाजारात उपलब्ध असलेल्या केसांच्या उत्पादनांऐवजी घरगुती केसांची उत्पादनं वापरायची असतील तर ही माहिती महत्त्वाची आहे. कारण स्वयंपाकघरातलाच एक जिन्नस यासाठी उपयोगी ठरतो. भेंडी ही भाजी केसांच्या आरोग्यासाठी वरदान आहे. तिचा वापर कसा करायचा हे समजून घेऊया.

advertisement

Diet Tips : कोमट पाण्यात जिरं, लिंबू घालून पिण्याचे फायदे, अनेक आरोग्य समस्या राहतील दूर

भेंडी ही भाजी, जवळजवळ सर्वांनाच खायला आवडते. भेंडीच्या भाजीनं जेवणाची चव तर वाढतेच पण भेंडी केसांच्या वाढीसाठी खूपच उपयुक्त ठरू शकते. केस गळणं, केस तुटणं आणि केस कमकुवत होणं याचा त्रास होत असेल तर भेंडीचं पाणी वापरून केसांचं आरोग्य चांगलं ठेऊ शकता.

advertisement

Gut Health : आतडी मजबूत ठेवण्यासाठी हे पदार्थ टाळा, ऐका डॉक्टरांचा सल्ला

भेंडीत जीवनसत्त्व, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह असे अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे केसांचा कोरडेपणा, केस तुटणं आणि केस गळण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1 की 2 नोव्हेंबर, कोणती एकादशी धरायची? तुळशी विवाहाचे दिवस, मुहूर्त आणि महत्त्व
सर्व पहा

भेंडीचं पाणी वापरल्यानं केस गळती रोखण्यास मदत तर होतेच. पण केस काळे, जाड आणि चमकदार बनवण्यासाठीही मदत होते. यासाठी, सर्वप्रथम तीन-चार भेंडी घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा. एका भांड्यात पाणी घालून ते उकळा. हे पाणी चांगलं उकळू दे, जेणेकरून भेंडीचं पाणी जेलसारखं दिसेल. आता हे जेल थोडं थंड होऊ द्या. केसांच्या मुळांवर हे जेल चांगलं लावा आणि काही वेळानं केस धुवा. आठवड्यातून दोनदा ते लावू शकता.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care : केसांच्या आरोग्यासाठी वापरा भेंडी, पावसाळ्यातल्या केस गळतीवर उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल