Gut Health : आतडी मजबूत ठेवण्यासाठी हे पदार्थ टाळा, ऐका डॉक्टरांचा सल्ला
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आपण जे खातो त्याचा आतड्याच्या सूक्ष्मजीवांवर थेट परिणाम होतो. विविध प्रकारचं अन्न आणि पोषक तत्व असलेला समृद्ध संतुलित आहार घेतल्यानं आतड्यातील जीवाणूंचं पोषण होतं आणि आतडी निरोगी राहतात. काही पदार्थांमुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि आतड्यांतल्या मायक्रोबायोमला त्रास देऊ शकतात.
मुंबई : शरीरात खाल्लेल्या अन्नाचं विघटन होणं, योग्य पचन होणं त्यासाठी आतड्यांची भूमिका महत्त्वाची असते. खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्वं शोषून घेणं, ज्यामुळे शरीराचं कार्य सुधारण्यासाठी मदत होते. याव्यतिरिक्त, निरोगी आतड्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती, मानसिक आरोग्य आणि चयापचयाचा वेग वाढतो.
आपण जे खातो त्याचा आतड्याच्या सूक्ष्मजीवांवर थेट परिणाम होतो. विविध प्रकारचं अन्न आणि पोषक तत्व असलेला समृद्ध संतुलित आहार घेतल्यानं आतड्यातील जीवाणूंचं पोषण होतं आणि आतडी निरोगी राहतात. काही पदार्थांमुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि आतड्यांतल्या मायक्रोबायोमला त्रास देऊ शकतात.
यावर गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट, डॉ. सौरभ सेठी यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमधे, आतडी निरोगी राखण्यासाठी काय टाळावं अशा पदार्थांची यादी शेअर केली आहे. आतड्यांच्या रक्षणासाठी ते कोणते आठ पदार्थ टाळतात आणि त्याऐवजी काय खाता येईल याचा त्यांनी पोस्टमधे उल्लेख केला आहे.
advertisement
1. अल्ट्रा-प्रोसेस्ड स्नॅक बार
या स्नॅक बारमधे इमल्सीफायर्स, बनावट तंतू आणि बियाण्यांचं तेल भरलेलं असतं. बहुतेक स्नॅक बार हे खूप प्रक्रिया करुन तयार केलेले असतात आणि त्यांचं पौष्टिक मूल्य खूपच कमी असतं. 'निरोगी' म्हणजेच हेल्दी असं लिहिलेलं असलं तरी यापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. याऐवजी, ते थोडा सुकामेवा, किंवा एखादं फळ खातात.
advertisement
2. शुगर-फ्री गम्स
कमी-कॅलरीयुक्त गोड पदार्थ किंवा कृत्रिम गोड पदार्थ जास्त नुकसान करू शकतात. सॉर्बिटॉलसारख्या गोड पदार्थांमुळे गॅस, पोटफुगी आणि अतिसार होऊ शकतो. याऐवजी, जेवणानंतर बडीशेप खा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
3. सॅलड ड्रेसिंग
बहुतेक सॅलड ड्रेसिंग निरुपद्रवी असल्याचं डॉ. सेठी यांनी म्हटलं आहे. यात अनेकदा भरपूर तेलं आणि भरपूर साखर असते. त्याऐवजी, सॅलडला मसालेदार बनवण्यासाठी घरचं साहित्य वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. यात ऑलिव्ह ऑइल, लिंबू, मोहरीचा वापर करता येईल.
advertisement
4. रिफाइंड तेल
ओमेगा-6 असलेलं आणि अनेकदा ऑक्सिडाइज्ड असलेलं तेल आतड्याच्या अस्तरासाठी हानिकारक असतं आणि यामुळे सूज येऊ शकते. याऐवजी, एवोकॅडो ऑईल, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह तेल, तूप किंवा नारळ तेलाचा वापर करणं योग्य ठरु शकतं.
5. फ्लेवर्ड दही
दही, हे एक चांगलं प्रोबायोटिक आहे. आतड्यांच्या आरोग्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. फ्लेवर्ड योगर्ट बहुतेकदा आरोग्यदायी सांगून म्हणून विकलं जातं. यात अतिरिक्त साखर आणि कृत्रिम चवीचं प्रमाण जास्त असतात. त्यामुळे बेरी, दालचिनी आणि चिया सीड्स असे पर्याय ते वापरतात.
advertisement
6. कॉफीत दूध
काही नागरिकांना लॅक्टोजचा त्रास होतो, त्यांना पोटफुगी आणि अस्वस्थता जाणवू शकते. लॅक्टोज संवेदनशील आतड्यांना त्रासदायक ठरू शकते. याऐवजी, साधी कॉफी वापरा किंवा दालचिनी आणि बदामाचं दूध वापरा.
7. इन्स्टंट नूडल्स
इन्स्टंट नूडल्समधे ती टिकवण्यासाठी भरपूर प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात आणि पोषण मूल्य कमी असतं, ज्यामुळे आतड्यांतील सूक्ष्मजंतूंसाठी हे योग्य नाही. याऐवजी, भाज्यांसह राईस नूडल्स खाणं चांगलं किंवा भाज्या घालून केलेलं सूप हा चांगला पर्याय आहे.
advertisement
8. ग्रॅनोला
डॉ. सेठी यांच्या मते, ग्रॅनोला हा आरोग्यदायी पर्याय वाटत असला तरी, अनेकदा गोड पदार्थांपेक्षाही हा पर्याय वाईट असतो. याऐवजी, ओट्स किंवा बेरी आणि चिया सीड्स घालून साधं दही खाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
हे पदार्थ टाळण्याव्यतिरिक्त, संतुलित आहार घ्या, पुरेसं पाणी पिणं, ताणतणावाचं व्यवस्थापन आणि निरोगी आतड्यांसाठी आहारात प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्सचा समावेश करा. नियमित शारीरिक हालचाली आणि जास्त अँटीबायोटिक औषधं टाळणं यामुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 24, 2025 7:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Gut Health : आतडी मजबूत ठेवण्यासाठी हे पदार्थ टाळा, ऐका डॉक्टरांचा सल्ला


