Brain Power : मेंदूची मशागत करत राहा, स्मरणशक्ती राहिल मजबूत, गोष्टी होतील सोप्या
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
स्मरणशक्ती मजबूत करायची असेल, विचार करण्याची गती वाढवायची असेल आणि लक्ष केंद्रित करायचं असेल, तर आठ सवयी महत्त्वाच्या आहेत. या सवयींचा वापर करणं खूप सोपं आहे आणि या सवयींमुळे मेंदूची शक्ती वाढवणं शक्य होतं.
मुंबई : मेंदू म्हणजे अथक काम करणारा अवयव. मेंदूची शक्ती जन्मत: ठरवली जात नाही, ती रोजच्या सवयींद्वारे वाढवता येते. मेंदू किती वेगानं काम करतो हे त्याचा वापर किती योग्यरित्या होताे यावर अवलंबून असतं.
स्मरणशक्ती मजबूत करायची असेल, विचार करण्याची गती वाढवायची असेल आणि लक्ष केंद्रित करायचं असेल, तर आठ सवयी महत्त्वाच्या आहेत. या सवयींचा वापर करणं खूप सोपं आहे आणि या सवयींमुळे मेंदूची शक्ती वाढवणं शक्य होतं.
मेंदूची शक्ती कशी वाढवायची ?
1. योग्य झोप घ्या - दररोज किमान सात ते नऊ तासांची झोप घेणं मेंदूसाठी आवश्यक आहे. आपण झोपतो तेव्हा मेंदू त्या दिवशी मिळालेली माहिती साठवतो आणि स्वतःला पुन्हा सेट करतो. अपूर्ण झोप मेंदूला आळशी बनवते.
advertisement
2. मेंदूला पोषक आहार द्या - काही खाद्यपदार्थांमुळे मेंदूला थेट बळकटी मिळत असते. अक्रोड, चिया सीड्स, जवस, फळांमधे असलेले ओमेगा-3 आणि अँटी-ऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना पोषण देतात आणि त्यांना अधिक सक्रिय बनवतात.
3. ब्रेन गेम्स खेळा - शब्दकोडी, सुडोकू, बुद्धिबळ यांसारखे खेळ मेंदूला सक्रिय ठेवतात. यामुळे विचार करण्याची क्षमता सुधारते आणि तर्कशक्ती मजबूत होते.
advertisement
4. लक्षात ठेवण्याऐवजी समजून घ्या - गोष्टी फक्त लक्षात ठेवून काही फायदा होणार नाही. जे काही नवीन शिकाल ते तुमच्या पद्धतीनं समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची सवय लावा. माईंड मॅप्स, नोट्स आणि पुनरावृत्ती करणं म्हणजेच ती गोष्ट समजून घेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं यामुळे माहिती दीर्घकाळ लक्षात राहण्यास मदत होते.
5. स्क्रीन टाइम कमी करा - प्रत्येक मोकळ्या वेळेत मोबाईल वापरणं आणि सोशल मीडिया स्क्रोल करत राहणं यामुळे मेंदू थकतो. हे लक्ष विचलित होण्याचं सर्वात मोठं कारण आहे. दिवसभरात स्क्रीनवर किती वेळ घालवायचा आहे ते ठरवा आणि त्यापेक्षा जास्त वेळ मोबाईलचा वापर करू नका.
advertisement
6. एका वेळी एकच काम करा - मल्टीटास्किंग ही एक प्रभावी पद्धत आहे, परंतु प्रत्यक्षात ती मनाला गोंधळात टाकू शकते. एका वेळी फक्त एकच काम केल्यानं लक्ष केंद्रित करणं आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मदत होते.
7. नवीन गोष्टी शिकण्याची सवय ठेवा - नवीन गोष्टी जाणून घेणं हे मेंदूसाठी व्यायामासारखं आहे. नवीन भाषा, वाद्य किंवा कोणतंही कौशल्य शिकल्यानं मेंदूला नवीन दिशेनं विचार करण्यास प्रवृत्त केलं जातं.
advertisement
8. शरीराची हालचाल महत्वाची - चालणं, धावणं किंवा कोणतीही शारीरिक हालचाल मेंदूला ऑक्सिजन पुरवण्यास मदत करते. यामुळे मन ताजंतवानं राहतं आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती वाढते. दररोज अर्धा तास चाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2025 6:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Brain Power : मेंदूची मशागत करत राहा, स्मरणशक्ती राहिल मजबूत, गोष्टी होतील सोप्या