Foot Massage : रोज करा पायांना मसाज, प्रकृतीसाठी गुणकारी आयुर्वेदिक उपाय

Last Updated:

आयुर्वेदातल्या काही सवयी दिनचर्येत असतील तर प्रकृतीत चांगला फरक पडू शकतो. अशीच एक सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी हलक्या  हातानं पायांची तेलानं मालिश करणं. याला 'पाद अभ्यंग' म्हणतात.

News18
News18
मुंबई : आयुर्वेदात सांगितलेले अनेक उपाय शरीरासाठी खूपच मोलाचे ठरतात. आयुर्वेदातल्या काही सवयी दिनचर्येत असतील तर प्रकृतीत चांगला फरक पडू शकतो. अशीच एक सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी हलक्या  हातानं पायांची तेलानं मालिश करणं. याला 'पाद अभ्यंग' म्हणतात.
आयुर्वेदिक अभ्यासक डॉ. अलका विजयन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी पायांना मालिश करण्याचे फायदे त्यांनी या व्हिडिओत सांगितले आहेत.
दृष्टीसाठी खूप उपयुक्त
आपले पाय शरीरातील 72,000 नसा आणि रक्तवाहिन्यांशी जोडलेले असतात. त्यामुळे पायांचं मालिश केल्यानं थकवा तर कमी होतोच, पण डोळ्यांच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरतं. पायांच्या तळव्यांमधे काही विशेष बिंदू असतात, ज्यांचा थेट डोळ्यांशी संबंध असतो. दररोज तीळाचं तेल किंवा तूप लावून हलक्या हातांनी मालिश केल्यानं डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि त्यामुळे दृष्टी सुधारते आणि जळजळ किंवा कोरडेपणा यासारख्या समस्यांपासून देखील आराम मिळतो.
advertisement
आरामदायी झोप
रात्री उशिरापर्यंत झोप येत नसेल आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर पायाला मसाज हा यावरचा एक अतिशय सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. तेलानं पायांना मसाज केल्यानं शरीर आणि मन शांत होतं, नसांना आराम मिळतो आणि तणावाची पातळी कमी होते. शरीर आणि मन दोन्ही शांत असेल तर झोप लवकर येते आणि मसाज केल्यानंतर येणारी झोप गाढ आणि आरामदायी असते.
advertisement
एकाग्रता आणि मनाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
पायांचा मसाज केवळ शरीरासाठीच नाही तर मनासाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे मानसिक थकवा दूर होतो आणि मेंदूच्या नसांना आराम मिळतो. यामुळे तुमची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याची शक्ती सुधारते.
advertisement
मालिश करण्यासाठी, दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाय चांगले धुवा आणि स्वच्छ करा आणि वाळू द्या. तिळाचं तेल, नारळ तेल किंवा गायीचं तूप मसाजसाठी वापरू शकता. यानं तळवे, टाचा आणि पायाच्या बोटांना पाच-दहा मिनिटं हलक्या हातानं मालिश करा. रात्रभर पायांवर तेल राहू द्या. सकाळी प्रथम कोमट पाण्यानं पाय धुवा आणि नंतर आंघोळ करा. हे नियमितपणे केल्यानं काही दिवसांतच फरक जाणवू लागेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Foot Massage : रोज करा पायांना मसाज, प्रकृतीसाठी गुणकारी आयुर्वेदिक उपाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement