Health Tips : भाज्यांची सालं टाकू नका, सालासकट भाज्या खाण्याचे हे फायदे नक्की वाचा

Last Updated:

बहुतेकवेळा, आपण भाज्या शिजवून खातो. भाजी सोलून झाली किंवा स्वच्छ करुन झाली की भाज्यांची सालं तुम्हीही फेकून देत असाल तर थांबा. ही माहिती आधी वाचा. कारण काही भाज्यांच्या सालींत भरपूर पोषक तत्व असतात. त्यामुळे सालं फेकून न देता सालासकट भाज्या खाण्यावर भर द्या.

News18
News18
मुंबई : स्वयंपाकासाठी भाजी चिरुन झाली की तुम्ही सालांचं काय करता ? अनेक जण ही सालं टाकून देतात काही जण त्याचा खतासाठी वापर करतात. बहुतेकवेळा, आपण भाज्या शिजवून खातो. भाजी सोलून झाली किंवा स्वच्छ करुन झाली की भाज्यांची सालं तुम्हीही फेकून देत असाल तर थांबा. ही माहिती आधी वाचा. कारण काही भाज्यांच्या सालींत भरपूर पोषक तत्व असतात. त्यामुळे सालं फेकून न देता सालासकट भाज्या खाण्यावर भर द्या.
या भाज्यांच्या सालीमध्ये फायबर म्हणजेच तंतूंचं प्रमाण, जीवनसत्त्व, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, हे सर्व घटक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. जर या भाज्या व्यवस्थित धुऊन खाल्ल्या तर या भाज्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या ठरू शकतात.
1. काकडी
काकडीच्या सालीत व्हिटॅमिन-के, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर सारखे घटक असतात. ते सालीसोबत खाऊ शकता.
advertisement
2. गाजर-
गाजराची साल खूप पातळ असते आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्यात फायबर आणि व्हिटॅमिन सी सोबत बीटा-कॅरोटीन असतं, पचनसंस्था आणि त्वचा दोन्हीसाठी गाजर फायदेशीर मानलं जातं. सॅलडमधेही सालीसह गाजर खाऊ शकता.
3. टोमॅटो
advertisement
टोमॅटोच्या सालीत लाइकोपीन मुबलक प्रमाणात असतं, हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी याचा उपयोग होतो.
4. कारलं
कारल्याची सालीत फायबर, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि यकृताला विषमुक्त करण्यासाठी याची मदत होते. कारलं पूर्णपणे धुऊन आणि मीठ लावून सालासह खाणं फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
5. बटाटा
बटाट्याच्या सालीत लोह, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. विशेषतः जर बटाटे सालींसह उकळून किंवा भाजून खाल्ले तर त्याची चव आणि फायदे आणखी वाढू शकतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : भाज्यांची सालं टाकू नका, सालासकट भाज्या खाण्याचे हे फायदे नक्की वाचा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement